Home चंद्रपुर जिल्हा विशेष विकासपुरुष सुधीरभाऊंना मंत्रीपद मिळालेच पाहिजे

विकासपुरुष सुधीरभाऊंना मंत्रीपद मिळालेच पाहिजे

1294

चंद्रपुर जिल्ह्यातील कार्यकत्यांची पायदळ दिल्ली वारी 

चंद्रपुर : जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंबरठ्यावर पोहोचवीत विकास कामे करणार्‍या विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत रोष व्यक्त केला जात आहे. नाराज असलेल्या जिल्ह्यातील कार्यकत्यांनी एकवटत चंद्रपुर, नागपुर ते दिल्ली पायदळ वारी काढली आहे.

.      सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली आणि जिल्हाला विकासाच्या नव्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अशा भाजपच्या आणि राज्यातील एका मोठ्या हेवीवेट नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होऊन पानावलेल्या डोळ्यांनी  चंद्रपूर वरून दिल्ली गाठायची आणि सुधीरभाऊंना मंत्रीपद मिळायची मागणी पक्षश्रेष्ठी समोर ठेवायची या विचारातून प्रेरित होऊन नागपूर मार्गे दिल्लीच्या दिशेने निघाले. दरम्यान बुधवारी रात्री उशीर झाल्यामुळे वरोरा येथे मुक्काम करण्यासाठी ते थांबले. त्यावेळी या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी व आपले समर्थन दर्शवण्यासाठी जागृती संघटनेचे अध्यक्ष तथा वरोरा जिल्हा झालाच पाहिजे या मागणीचां पुढाकार घेणारे प्रवीण धनवलकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमित चवले यांनी या कार्यकर्त्यांची भेट घेऊन आपले समर्थन या मागणीला दर्शविले. या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन समोर निघत आहे.

.     यावेळी मुख्य कार्यकर्ते फारुक शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तांबटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्त्यांचा चंद्रपूर वरून निघालेल्यां कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे.

error: Content is protected !!