सात सुवर्ण तर पाच रजत पदके पटकाविली
भद्रावती : औरंगाबाद येथे पार पडलेल्या आठव्या फा-हियान राष्ट्रीय ओपन कराटे कप 2024 या स्पर्धेत भद्रावती शहरातील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सात सुवर्ण तर पाच रजत पदके प्राप्त केली केले.
. सदर स्पर्धेत देशभरातील 1500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. साची चावरे हिने मुलींच्या 10 व 11 वयोगटांमध्ये फाईट व काता या प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली, नैताकी बनपुरकर याने मुलांच्या दहा व अकरा वयोगटांमध्ये फाईट व काता या प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. जिया घोडे हिने मुलींच्या बारा व तेरा या वयोगटात फाईट व काता प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक प्राप्त केले. सोनाक्षी कोंडस्कर हिने मुलींच्या अकरा व बारा वयोगटात फाईट व काता प्रकारात एक सुवर्ण तर एक रजत पदक प्राप्त केले. शोर्धाज राज याने मुलांच्या अकरा व बारा या वयोगटात फाईट व काता या प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक प्राप्त केले. तर साक्षी कपाट हिने मुलींच्या 9 व 10 वयोगटात फाईट व काता या प्रकारात दोन रजत पदके प्राप्त केले.
. सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय राकेश दीप, शितल तेलंग, अशी आशीष रीगने, संदीप चावरे, पिंटू मरस्कोल्हे, दामिनी सूर्यवंशी व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. यश प्राप्त केल्याबद्दल सदर खेळाडूंचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.


