Home चंद्रपुर जिल्हा विशेष चर्मकार बांधवांची विधानसभेवर धडक

चर्मकार बांधवांची विधानसभेवर धडक

1270

हजारो समाज बांधवांचा सहभाग

प्रलंबित मागण्या सोडविण्याची केली मागणी

विसापूर : राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने चर्मकार बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियम मधून विधानसभेवर गुरुवारी धडक दिली.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वात व विदर्भ अध्यक्ष संभाजी वाघमारे यांच्या माध्यमातून निघालेल्या मोर्च्यात हजारोवर चर्मकार बांधव सहभागी झाले होते. दरम्यान हा मोर्चा पोलीस प्रशासनाने टी पाईंट येथे अडवून शासनामार्फत मागण्यांचे निवेदन स्विकारले.

.      विधानसभेवर धडक दिलेल्या चर्मकार बांधवांनी मोर्च्यादरम्यान संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करा. संत रविदास नावाने विद्यापीठ निर्माण करून १00 एकर जमीन तथा निधीची तरतूद तातडीने करावी. संत रविदास महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. समाजहितासाठी संत रविदास महाराज यांचे नावे बार्टीच्या धर्तीवर प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे.संत रविदास महाराज चर्मोद्योग व विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळातील सभासद तातडीने नियुक्ती करावी.या मंडळासाठी मुंबई येथे प्रशस्त कार्यालय सुरु करावे.चर्मकार बांधवांसाठी आयोगाची निर्मिती करावी. गटई कामगारांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा.चर्मकार बांधवांच्या पाल्यासाठी अस्वच्छता शिष्यवृत्ती त्वरित द्यावी. या व अन्य मागण्या चर्मकार बांधवांनी मोर्च्यादरम्यान शासनाकडे लावून धरल्या. शासनाच्या प्रतिनिधी सोबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप व विदर्भ प्रदेश अध्यक्ष संभाजी वाघमारे यांनी सकारात्मक चर्चा करून चर्मकार बांधवांच्या न्याय मागण्या सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रतिनिधी सुभाष भटवलकर यांनी दिली.

error: Content is protected !!