चंद्रपूर : चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील वरोरा शहरातील रत्नमाला चौकात फार मोठी वर्दळ असते. या रत्नमाला चौकातूनच वरोरा ते चंद्रपूर, आणि वरोरा ते नागपूर जाणारे प्रवासी फार मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स धारकांची मोठी शर्यत पाहायला मिळतात. प्रवासी आपल्याच ट्रॅव्हल्स मध्ये बसला पाहिजे म्हणून तिकीट दरात सुद्धा कमी जास्त केल्या जात असल्याचा प्रकार ही इथे दिसून येत आहे. ऐन महामार्गांवर एका मागोमाग नागपूर जाणाऱ्या चार ट्रॅव्हल्स लाईन दोरीने उभ्या राहिल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे. तर इतर वाहनानी जायचं कुठून साहेब. असं म्हणण्याची वेळ सामान्य प्रवासात बोलल्या जात आहे.


