Home चंद्रपुर जिल्हा विशेष शुल्लक कारणावरून वयोवृद्ध इसमाची हत्या

शुल्लक कारणावरून वयोवृद्ध इसमाची हत्या

1287

भद्रावती : माझ्या शेतात काड्या कशाला टाकत आहे या कारणावरून दोघात वाद झाला, रागाच्या भरात आरोपीने वृद्ध शेतकऱ्याला दगडाने जबर मारहाण केली यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भद्रावती तालुक्यातील खुटाळा येथे सोमवारी सकाळी 9 वाजता च्या सुमारास घडली वासुदेव मारोती हजारें (77 ) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

.       पोलीस सूत्रानुसार भद्रावती तालुक्यातील खुटाला येथील वृद्ध शेतकरी वासुदेव हजारें हे शेतात असताना त्यांच्या शेतात आरोपी चंपत पांडुरंग ढोक (56) हे लाकडी काड्या (सरपण) टाकत होता. त्या वर मृतकाने आरोपीला विचारले असता. माझ्या शेतात काड्या कशाला टाकत आहे या कारणावरून यांच्यात वाद झाला, रागाच्या भरात आरोपीने मृतक याचे डोक्यावर डोळ्या जवळ व छातीवर दगडाने मारून जखमी केले. त्या नंतर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले असता, मार जबर असल्यामुळे त्याला चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय मध्ये हलवले असता सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेद्रसिंग यादव यांनी केली असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी चिमूर जाधव करीत आहे.

error: Content is protected !!