Home चंद्रपुर जिल्हा विशेष नेरी परिसरात एकाच दिवशी अनेक ठिकाणी पट्टेदार वाघाचे दर्शन

नेरी परिसरात एकाच दिवशी अनेक ठिकाणी पट्टेदार वाघाचे दर्शन

1285

वाघाला बघण्यासाठी सिरपूर पहाडीवर उडाली झुंबड

वनविभागाव ऍक्शन मोडवर

नेरी : नेरी परिसरातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी वाघ दिसल्याने नागरिक भयभीत झाले असून या परिसरात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे ? मात्र वनविभाग सुद्धा तेवढ्याच गतीने ऍक्शन मोडवर आहे. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत आहे, आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देत वाघाला हकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

.       नेरी परिसरातील खुंटाला पट परिसरात पंढरवानी शेत शिवारात तर सिरपूर मार्गावरील पहाडीच्या परिसरात सायंकाळी 5 वाजता वाघाने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच झुबड उडविली. मात्र वाघ शांततेत झुडपात होते. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेरी क्षेत्र सहायक रासेकर, वनरक्षक वडझे आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल होत वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न करने ग्रस्त लावीत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. तसेच नेरी येथील निखिल पिसे यांच्या शेतशिवरात सुद्धा वाघाचे दर्शन झाल्याने मजुरवर्गात तारांबळ उडाली तसेच चिमूर कडे जाणाऱ्या नेरी समोरील शेतशिवारात वाघ ठाण मांडून महिला मजुरांना दिसला.

.        दि 15 डिसेंबरला नेरी जवळील सिरपूर मार्गावर नाल्याजवल काही नागरिकांना वाघ दिसला. तर याच मार्गाने समोर वाघे व चाफले यांच्या शेतात वाघ दिसल्याने कापूस वेचणाऱ्या महिलांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी आरडाओरडा करून वाघाला हाकलले त्यामुळे या परिसरात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. या वाघामुळे मजुरात, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 9 डिसेंबरला पंढरवानी येथील महिलेवर तर 11 डिसेंबर ला सरडपार शेतशिवरात ट्रकटर चा पाठलाग यामुळे आधीच नागरिक भयभीत आहेत. शेतीची कामे कशी करावे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे ? मात्र वनविभाग जलदगतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून गस्त वाढवून त्यावर लक्ष ठेवून आहे. यात 15 ते 20 ग्रस्तपथक तयार केले असून कॅमेरे तसेच इतर साहित्य वाघावर पाळत ठेवण्यासाठी कार्यान्वित ठेवले आहेत. तसेच दिवस रात्र या मोहिमेवर वनविभाग कार्यान्वित आहे. वनअधिकारी कर्मचारी हे मजूर वर्ग शेतकरी यांना समूहाने सावधानता बाळगून शेतात जाण्याचा सल्ला देत आहेत. तर काहींना ग्रस्त पथक नेमून सवरक्षण देत आहेत एवढी जोरदार मोहीम वनविभाग सुद्धा राबवित आहेत. वाघ अनेक असल्याची शंका असल्याने त्यांची सुद्धा तारांबळ उडत आहे. मागील दोन महिन्यांपासून ते सुद्धा याच मोहिमेवर आहेत. काही ठिकाणि वाघ पकडण्यासाठी पीजरे सुद्धा लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा या वाघांना पकडून किंवा हुसकावून लावून नागरिकांचे स्वरक्षण करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे. तेव्हा वनविभागाने या बाबीची दखल घ्यावी.

error: Content is protected !!