चंद्रपूर : चंद्रपूर शहर सात किलोमीटर अंतर्गत परिसरात व विठ्ठल मंदिर प्रभागातील सर्व जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा विठ्ठल मंदिर चंद्रपूर येथे करण्यात आला.
. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. समाजसेवक राहुल देवतळे यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातील गोरगरीब जनतेसाठी अनेक कार्यक्रम राबवलेले असून त्यांच्या या कार्यास कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाला दीपक जयस्वाल, बिंदू बडकेलवार, धन्ना येरेवार, अरूण गर्गेलवार, संजू जिझीलवार, बंडू बडकेलवार, वसंता पवार, अशोक पडगिलवार, मधु श्रीरामे, सुहास पिंगे, अनिल दळणे, व मित्रपरिवार उपस्थित होते.


