Home राजकीय मंत्रिमंडळात चिमूर क्रांतिभूमीला भोपळा

मंत्रिमंडळात चिमूर क्रांतिभूमीला भोपळा

1270

नेरी : रविवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्याला भोपळा मिळाला असून तब्बल 3 वेळा बहुमताने विजयी करणाऱ्या क्रांतिभूमीला सुद्धा भोपळा मिळाल्याचे पहावयास मिळाले आहे.

.       चिमूर क्रंतीभुमी ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून विकासाचे कोसो दूर आहे. याकडे कोणत्याही राजकीय पक्षाने लक्ष दिले नाही. मागील 10 वर्षापासून चिमूर करिता बंटी भांगडिया हे विकास पुरुष लाभले. त्यामुळे विकासाचा वेग वाढवा व चिमूर विकसित व्हावे ही अपेक्षा शासनाकडून वाढलेली होती. निवडणुकीच्या निकालापासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडिया यांना मंत्रि म्हणून स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. या निवडणुकी मध्ये खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिमूर चे उमेदवार असलेले बंटी भांगडीया चे प्रचारासाठी आलेले होते त्यामुळे या वर्षी युवा चेहरा म्हणून व क्रंतिभुमीचे विकासासाठी चिमूर ला मंत्री मिळेल अशी आशा होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात चिमूर क्रांतिभूमीला व चंद्रपूर जिल्ह्याला निराशा मिळालेली आहे.

error: Content is protected !!