गडचांदूर : चंद्रपूर येथील आदर्श अकॅडमीचे 36 विद्यार्थी भोयगाव नदीपात्रातील रेतीवर प्रॅक्टिस करण्यासाठी आले असता त्यातील दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. यातील एका 20 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले आहे. हे विद्यार्थी आदर्श अकॅडमीचे कोच आदर्श चीवंडे यांच्यासोबत आले होते. संध्या शिंदे (२०) रा. जिवती व युगल नागापुरे (१९) रा. सोनापूर अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे आहेत.
. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील आदर्श अकॅडमीचे कोच आदर्श चिवंडे हे पोलिस भरतीचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात त्यांनी अकॅडमी मधील ३६ विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी रविवारी धानोरा भोयगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर आणले होते.प्रॅक्टिस झाल्यानंतर काही प्रशिक्षणार्थी पैनगंगा नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे व समीक्षा शेंडे (२०) चंद्रपूर हे तिघे खोल डोहात बुडाले. या युवतींना वाचविण्यासाठी युगल नागापुरे याने पाण्यात उडी मारली. मात्र, तो देखील पाण्यात बुडाला. समीक्षा शेंडे ही युवती कशीबशी बाहेर निघाली. पण, संध्या शिंदे आणि युगल नागापुरे यांचा बुडून मृत्यू झाला. उपस्थित युवकांनी संध्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिला गडचांदूर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, तिचा रस्त्यातील कवठाळा जवळ मृत्यू झाले. तर गोंडपिपरी तालुक्यातील सोनापुर देशपांडे येथील 19 वर्षीय युगलचा मृतदेह सायंकाळी ६ वाजेपर्यंत आढळून आला नाही.


