Home सामाजिक 17 डिसेंबरला नंदोरी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

17 डिसेंबरला नंदोरी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

1299

चंद्रपुर : श्री. संत गमाजी महाराज विकास मंडळ नंदोरी बु च्या वतीने स्व. सेनाजी सखाराम मांडवकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थी गुण गौरव सोहळा मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

.        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर उपस्थित राहणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती धनराज विरुटकर, उपसरपंच उषा लांबट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम ढवस, तंटामुक्त अध्यक्ष आशीतोष घाटे, हनुमान मंदिर देवस्थान चे अध्यक्ष तुळशीदास लांबट, ग्रामपंचायत सदस्य तथा हनुमान मंदिर देवस्थान चे सचिव किशोर उमरे, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, आनंदराव जिवतोडे,  माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद लांबट, जिल्हा परिषद शाळा नंदोरी चे मुख्याध्यापक मनोहर राजगिरे, सेवानिवृत शिक्षक किशोर नगराळे उपस्थित राहणार आहे.

.       या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करावे असे आवाहन श्री. संत गमाजी महाराज विकास मंडळ नंदोरी बु तथा गोपालकृष्ण सेनाजी मांडवकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!