Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूरात पुन्हा मिळाल्या दोन तलवारी

बल्लारपूरात पुन्हा मिळाल्या दोन तलवारी

1301

एकाला अटल

बल्लारपूर पोलीसांची कारवाई

बल्लारपूर : मागील काही दिवसापासून घडत असलेल्या घटनेने बल्लारपूर शहर हादरून गेले आहे. 3 डिसेंबर ला तीन अग्निशस्त्र आणि अठरा जिवंत काडतूस मिळाली होती. तर आतापर्यंत अनेक ठिकाणी तलवारी जप्त करण्यात आल्या असताना पुन्हा शनिवारी पोलिसांच्या गस्ती दरम्यान 2 तलवारी जप्त करण्यात आल्या असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

.     बल्लारपूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक बल्लारपूर शहरात शनिवारी (दि.१४) गस्त करत असताना गोपनीय माहिती मिळाली कि भगत सिंह वॉर्डामध्ये कमल रामचंद्र वर्मा (२१) हा युवक दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घरी तलवार लपवून ठेवत असतो. या माहिती च्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी त्याचे घर गाठत घराची झडती घेतली. या दरम्यान दोन तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी कमल रामचंद्र वर्मा याला अटक करून कलम २५, ४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

.        ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. टोपले, पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा, गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोलिस हवालदार सत्यवान कोटनाके आदींनी केली.

error: Content is protected !!