Home चंद्रपुर जिल्हा विशेष धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्याला अटक

धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्याला अटक

1293

आरोपीकडून १0 मोबाईल हस्तगत

रेल्वे पोलिसांनी केली कारवाई

विसापूर : तो प्रवासी रेल्वे गाडीत बसायचा.प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीशी हितगुज करायचा.दरम्यान रेल्वे गाडीचा वेग मंदावताच हाताला हिसका मारून मोबाईल पाडायचा. अशाच एका धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला वर्धा येथील लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याचे कडून चोरी केलेले १0 मोबाईल सह १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केल्याची घटना सोमवारी घडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे समीर शेख शब्बीर शेख रा. चंद्रपूर असे नाव आहे.

.     या प्रकरणी रेल्वे प्रवाशांने दिलेल्या फिर्यादी नुसार पुलगाव ते बल्लारपूर दरम्यान नवजीवन एक्सप्रेस गाडी क्रमांक १२६५५ मध्ये जनरल डब्ब्यातून प्रवास करत होता. त्याला डब्ब्यात बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे तो रेल्वे बोगीच्या दरवाजा जवळ मोबाईल हातात घेऊन बसला होता. ही रेल्वे बाबुपेठ रेल्वे स्थानकावर आली.त्यावेळी रेल्वेचा वेग मंदावला होता. ही संधी आरोपी समीर शेख शब्बीर शेख याने साधली.

.    नवजीवन एक्सप्रेसचा वेग मंदावताच त्याने प्रवाशांच्या हाताला जोरदार झटका दिला. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडताच त्याने पोबारा केला. या घटनेची तक्रार रेल्वे प्रवाशाने बल्लारशाह रेल्वे पोलिसांत केली.या घटनेप्रमाणे रेल्वे पोलिसांनी वर्धा येथील रेल्वे पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 3५3/२0२४ अन्वये कलम 30४ ( २ ) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधार्थ पथक गठीत केले. रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने समीर शेख शब्बीर शेख यास अटक करून त्याचेकडून १0 मोबाईल सह १ लाख ४८ रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई वर्धा रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षल चाफले यांच्या मार्गदर्शनात संतोष वडगिरे, संदेश लोणारे, पंकज भांगे, चंदन डेहनकर, अखिलेश चौधरी यांनी केली.

error: Content is protected !!