Home सामाजिक नेरी येथे आजपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

नेरी येथे आजपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

1287

नेरी : श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी च्या वतीने मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे संगीतमय ग्रामगीता तत्वज्ञान प्रचार व प्रसार सप्ताहा चे आयोजन दि. 12 ते 19 डिसेंबर या सात दिवसांमध्ये संपन्न होणार आहे.

.      या पुण्यतिथी महोत्सवाला दि. 12 डिसें रोज गुरुवारला सकाळी ठीक 9 वाजता घटस्थापनेने डॉ. श्याम हटवादे यांच्या हस्ते होणार आहे,यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे, शुक्रवार 13 डिसें ला हृदयरोग व मधुमेह आरोग्य तपासणी शिबिर, 14 डिसें ला गुरुदेव महिला कार्यकर्त्यांचा मेळावा 15 डिसें ला ग्रामगीता वाचन स्पर्धा यामध्ये वयोगट 10 वर्ष ते 14 वर्षे , वेळ राहणार आहे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर वैयक्तिक भजन स्पर्धा वयोगट 10 ते 14 वर्षे , वेळ दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत असे विविध कार्यक्रम या साप्ताह निमित्य या ठिकाणी होणार या आहे, दररोज सायंकाळी 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत ह. भ. प. डॉ. श्रद्धांताई प्रशांत ठाकरे राष्ट्रिय युवा प्रबोधनकार यांचे संगीतमय ग्रामगीता प्रवचन होणार आहे, या निमित्ताने रोज प्रार्थनेच्या महत्त्वावर या ठिकाणी मान्यवरांचे टिकाराम वाघमारे, कमलाबाई गुळधे, घनश्याम चापले चरडे , नथु भोयर गजानन ठाकरे आणि प्रा. राम राऊत या सर्व मान्यवरांचे या प्रार्थनेचे महत्त्वा वर मार्गदर्शन होणार आहे.

.      त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता बुधवारला रात्रौ ठीक 10 वाजता ग्रामगीता ग्रंथाचे पूजन आणि त्यानंतर रात्री जागृती भजन आणि त्यानंतर 19 तारखेला दुपारी 12 वाजता ह.भ.प.डॉ. श्रद्धाताई प्रशांत ठाकरे अकोला यांच्या उपस्थितीमध्ये गोपाल काल्याने सुरुवात होईल आणि या कार्यक्रमानिमित्त काही मान्यवरांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन होणार आहे, आपल्या चिमूर-गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार . बंटी भागडीया चिमूर, रेखाताई ना. पिसे सरपंच ग्रा.प. नेरी, दादाराव पिसे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी, रवींद्र पंधरे अध्यक्ष व्यापारी अशोषियशन नेरी , मंगेश चांदेकर अध्यक्ष पंढरीनाथ देवस्थान नेरी, , अशोक लांजेकर अध्यक्ष जगन्नाथ बाबा देवस्थान नेरी, रूपचद चौधरी अध्यक्ष शंकर देवस्थान नेरी, यांचे या गोपालकालाच्या निमित्ताने मार्गदर्शन होणार आहे

error: Content is protected !!