मदनापूर येथील घटना
नेरी : चिमूर तालुक्यातील पळसगाव वन परीक्षेत्रातील मदनापूर बीटात दिनांक ८ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
. मदनापूर येथील जंगल परिसरात गाव शेजारी तलावात गावातील जनावरे चारायला सोडले जातात. दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गेल्या दोन दिवसापासून कहर केला असून दोन दिवसात एक गाय तर आज एक बैल मारला आहे. या हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. बैल मदनापूर येथील वासुदेव बुद्धाजी शेंडे या शेतकऱ्याचा मालकीचा आहे. मधुकर भोयर यांचा शेतात पेरणी करीत असताना बैलाला ठार केले आहे.ऐन रब्बी हंगामात एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.


