Home Breaking News राजस्थानातील खुर्ची विकणार्‍या घोळक्यांचा महावितरणच्या कर्मचार्‍यांवर हल्ला

राजस्थानातील खुर्ची विकणार्‍या घोळक्यांचा महावितरणच्या कर्मचार्‍यांवर हल्ला

1545

विद्युत पोलवर तारा टाकून करत होते चोरी

17 जणांवर गुन्हे दाखल

चंद्रपुर : राजस्थान राज्यातून प्लॅस्टिक खुर्ची विकण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंडपिपरी येथील चिंतामणी महाविद्यलयासमोर आपले बस्तान मांडले. दरम्यान विद्युत पोलवर तारा टाकून चोरीच्या मार्गाने ते विद्युत पुरवठा करित असल्याची तक्रार काहींनी महावितरणकडे केली. तात्काळ अभियंत्याने चौकशी व कार्यवाहीसाठी चार लाईनमॅन ला घटनास्थळी पाठविले. चौकशी सुरू केली. आणि  क्षणातच राजस्थानी लोकांच्या घोळक्यांनी या चौघांवर हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले. तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी गोंडपिपरी पोलीसात राजस्थानच्या तब्बल सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.      गोंडपिपरी शहरात सध्या परप्रातींयाची संख्या कमालीची वाढली आहे. राजस्थान येथील ३५ लोकांचा समुह गांडपिपरी येथे खुर्चा विकण्यासाठी आला. गोंडपिपरी येथील चिंतामणी महाविद्यालय परिसरात त्यांनी आपला डेरा ठोकला. दरम्यान विद्युत पोलवर तारा टाकून चोरीच्या मार्गाने ते विद्युत पुरवठा करित होते. काही लोकांच्या डा प्रकार आला. त्यांनी महावितरणचे सहायक आनपता ढवस यांच्याकडे याप्रकाराची तक्रार केली.लक्षात हा प्रकार आला. त्यांनी महावितरणचे सहायक अभियंता ढवस यांच्याकडे याप्रकाराची तक्रार केली. यानंतर ढवस यांनी क्विक एक्शन घेतली. त्यांनी तातडीने रवि जांभूळकर, प्रेमानंद गौरकार, हिराजी ठेंगणे, किशोर बोरकुटे यांना घटनेचा तपास व कार्यवाही करण्यासाठी पाठविले. काल रात्री तिथे पोहचले असता सदर तक्रारीत तथ्य आढळून आले.त्यांनी सदर घटनेची पुराव्यासाठी फोटोग्राफी केली. सोबत व्हिडीओ देखिल घेतले. याचदरम्यान राजस्थानी लोकांच्या समुहाने त्यांच्यावर आक्रमण केले. यात रवि जांभुळकर, व किशोर बोरकुटे गंभीर जखमी झाले. तर गौरकार व ठेगंणे यांनाही किरकोळ मारहाण झाली. रवि जांभुळकर यांना जास्त मार असल्याने त्यांना चंद्रपूरात दाखल करण्यात आले. तर बोरकुटे यांच्यावर गोंडपिपरीत उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच महावितरण विभागात एकच खळबळ माजली.

.      महावितरणच्या अधिका-यांनी तातडीने गोंडपिपरी पोलीसांना यासंदर्भातील तक्रार दाखल केली. गांडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठत सदर प्रकरणी कार्यवाही केली. सोबत या प्रकरणातील तब्बल सतरा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहे.

error: Content is protected !!