रत्नमाला चौक ते तालुका कृषी कार्यालय वरोरा पर्यंत होणार आंदोलन
भिकेची रक्कम राज्य सरकारला पाठविणार
वरोरा : मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकर्यांचे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर चणा, गहू या पिकावर गारपीट झाली. पीक विमा कंपनीने फक्त सोयाबीन पिकाचा विम्याचे पैसे शेतकर्यांना दिले. मात्र कापूस पिकाचा पीक विमा दिला नाही. याबाबत राज्य सरकारचे लक्षं वेधण्यासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून रत्नमाला चौक ते तालुका कृषी कार्यालय वरोरा येथे भीक मॅंगो आंदोलन करण्यात येणार आहे. या भिकेतून मिळणारी रक्कम राज्य शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती डुकरे यांनी दिली.
. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकर्याला संबोधले जाते. मात्र शासनाच्या लालफीतशाहीमुळे अजूनही शेतकरी भरडल्या जात आहे. शेतकर्यांच्या शेत पिकांना हमी भाव दिल्या जात नाही. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकर्यांचे नुकसान होत आहे. शेतसाठी लावलेला खर्च निघत नसतानाही शेतकरी शेती करत आहे. शेतकर्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकार कडून एक रुपयात पीक विमा काढल्या जात आहे. मात्र पीक विमा कंपनीकडून दखल घेतल्या जात नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई दिल्या जात नाही. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकर्यांचे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पीक विमा कंपनीने फक्त सोयाबीन पिकाचा विम्याचे पैसे शेतकर्यांना दिले. मात्र कापूस पिकाचा पीक विमा दिला नाही. तर मागील वर्षी रब्बी हंगाम चणा, गहू या पिकावर गारपीट झाली. त्यांचे महसूल विभाग कडून पंचेनामे करुन हेक्टरी 13 हजार 500 रुपये या प्रमाणे शेतकरी यांना रक्कम दिली. मात्र शेतकरी पीकाचा पीक वीमा काढला मात्र या पीकाचे पंचनामे करून तुटपुंजी रक्कम पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिली. मागील वर्षाचा कपाशी वरील पीक विमा देण्यासाठी सरकार जवळ पैसे नसल्याने आम्ही शेतकरी भीक मागून गोळा झालेले पैसे राज्य सरकारला परत देणार असल्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी सांगितले.


