Home सामाजिक नवेगाव हुंडेश्वरी येथें महपरिनिर्वाण दिन उत्साहात

नवेगाव हुंडेश्वरी येथें महपरिनिर्वाण दिन उत्साहात

1289

नागभीड : तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथें महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत त्यांना अभिवादन करण्यात आले. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

.       यावेळी कार्यकर्माचे अध्यक्ष म्हणून दुर्वेकांत बनकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पेंदाम, ह. भ. प. उदाराम बावणे महाराज, माजी सरपंच दादा सोनुले, सरपंच नलू नेवारे, रोशन सोनुले, मंदा गुरनुले प्रा डॉ. पूनम घोनमोडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी “हाती न घेता तरवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 56वी पुण्यतिथी साजरी करून तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला असंख्य समुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार रोशन सोनुले यांनी केले.

error: Content is protected !!