Home चंद्रपुर जिल्हा विशेष अन तब्बल तीन तास उशिरा पोहचले विद्यार्थी घरी

अन तब्बल तीन तास उशिरा पोहचले विद्यार्थी घरी

1296

राजुरा आगार प्रमुखांकडून विद्यार्थ्यांची थट्टा

दोन तास विद्यार्थी थंडीत कुडकुडत

तहसीलदारांच्या आदेशाने रात्रौ 7 वाजता लागली बस

राजुरा : शाळा सुटली. विद्यार्थी गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर पोहचले. दोन तास झाले तरी बस लागली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेतली. बस प्रमुखांनी बस गेल्याचे सांगतात विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात सापडला. विद्यार्थी थंडीने कुडकुडत होते. अशातच एकाने युक्ती लढवली आणि त्याने थेट तहसीलदारांची भेट घेतली आणि आगार प्रमुखांचा खोटारडे पणा समोर आणत त्या विदयार्थ्यांना सुखरूप गावांना पोहचविण्यासाठी बस पाठविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

.    राजुरा येथे शिक्षण घेण्यासाठी खेडोपाड्यातून विद्यार्थी बस ने प्रवास करीत येत असतात. राजुरा बस स्थानक नेहमीच कोणत्या ना कोणत्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते. अशातच तुलाना येथील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बस स्टँड वर आले. 5 वाजता पासून 7 वाजेपर्यंत अंधारात थंडीने कुडकुडत बस ची वाट बघत बसले होते परंतु बस मात्र लावण्यात आली नाही. त्यानंतर 7 वाजता विद्यार्थ्यांनी चौकशी मध्ये विचारले असता बस गेल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे विद्यार्थी भयभीत होऊन बस गेलीच नाही पण बस गेल्याचे सांगण्यात येत असल्याने बस स्थानका पासून जवळच असलेल्या तहसील कार्यालयात गेले व झालेले प्रकरण तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांना सांगितले असता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष अधिकारी ओमप्रकाश गौंड तहसीलदार राजुरा यांनी क्षणाचाही विलंब न करता एस टी च्या वरिष्ठ अधिाऱ्यांशी बोलून त्वरित बस ची व्यवस्था करून दिली व यामधे चौकशी अधिकारी यांनी बस तुलाना येथे गेल्याचे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात मात्र बस गेलीच नाही, सदर प्रकार हा गंभीर असून कागदोपत्री गेलेली बस प्रत्यक्षात मात्र का गेली नाही म्हणून सदर प्रकरणात दोषीवर कार्यवाही ची मागणी पालकांनी केली आहे, तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांनी एस टी च्या अधिकाऱ्यांना संबंधित कागदपत्रे दाखविण्याचे सांगितले.

error: Content is protected !!