राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार
चिमूर : गुरुकुंज आश्रम,मोझरी येथून रवाना झालेली वारी प्रबोधनाची ही यात्रा चिमूर तालुक्यात दाखल झाली आहे.विविध गावात गुरुदेव सेवा मंडळ यांचे कडून या यात्रेचे जलोषात स्वागत करण्यात येत आहे.
. अध्यात्म गुरुकुल आश्रम मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी व गावागावात श्री गुरुदेव मंडळाच्या शाखा निर्माण करण्यासाठी विविध प्रबोनकारांचा व विचारवंतांचा समावेश असलेली वारी प्रबोधनाची ही यात्रा गावागावात भ्रमण करीत आहे.
. या यात्रेत गुरूकुंज आश्रम येथील प्रबोधनकार रवी मानव, राज घुमणार यांचा समावेश आहे. या यात्रेचे शेडेगाव, बंदर, सोनेगाव, खंडाळा, वाहानगाव येथे भेट दिली. विनायक औतकर, डा.दीपक दडमल, करण नागोसे, हरी कामडी, प्रतीक औतकर हे गुरुदेव भक्त या वारीला सहकार्य करीत आहेत.


