Home राजकीय अँड.अमोल बावणे वरोरा – भद्रावती विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटातून लढणार?

अँड.अमोल बावणे वरोरा – भद्रावती विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटातून लढणार?

817

तरुण उमेदवार मिळाल्यास वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात नवीन समीकरण बदलणार.

चंद्रपूर
.          वरोरा – भद्रावती विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार बाशिंग बांधून आमदारकीच्या बोहल्यावर चढायला सज्ज आहे. पण राजकीय अनुभव नसलेले व वयाचं भान नसलेले उमेदवार विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यास खरोखरंच सक्षम नसल्याचे अनेक दाखले लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून जनतेला मिळाले आहे त्यामुळे उमेदवार हा उच्चशिक्षित व तरुण हवा व त्याला प्रशासकीय अनुभव हवा तेव्हाच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न मार्गी लागेल या अर्थाने अँड. अमोल बावणे यांची वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी मोठे आव्हान उभे करणारी ठरणार असुन ते राष्ट्रवादी अजित पवार गटातून लढण्यास इच्छुक असल्याचे बोलल्या जातं आहे.
.          वरोरा विधानसभा क्षेत्रात जे उमेदवार इच्छुक आहे त्यापैकी कित्तेकांना या क्षेत्राचा भूगोल व इतिहास माहीत नाही. फक्त त्यांना आमदार व्हायचंय पण या विधानसभा क्षेत्राचा मास्टर प्लान त्यांच्याकडे नाही, केवळ आपल्याला संधी आहे. म्हणून ते लढण्याची जिद्द बाळगून आहे पण आमदार बनल्यानंतर जर आपल्याकडं एक विशिष्ट ध्येय नसेल तर मग हा नुसता पोरखेळ होईल याबद्दल सद्यस्थिती काय आहे हे येथील जनतेला चांगलं माहीत आहे. दरम्यान निवडणुकीसाठी विविध राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक गटात विखुरलेले पक्ष पदाधिकारी आम्हीच खरे उमेदवार असा देखावा करत असले तरी या क्षेत्रात जर महाविकास आघाडी लढली तर इथे कॉंग्रेस आणि महायुती लढली तर शिवसेना शिंदे गट किंव्हा राष्ट्रवादी अजित पवार गट यांना संधी मिळेल अशी स्थिती आहे. खरं तर शिंदे गट विदर्भात आपला दावा करेल अशी तूर्तास संभावना नाही त्यामुळं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला इथे संधी आहे आणि अँड अमोल बावणे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना एक तरुण व सजग असा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मोठी पसंती मिळू शकते असे राजकीय विश्लेषक सांगत आहे.

.          महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास एक वर्षाचा कालावधी आहे मात्र वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आपली व्युहरचना करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांची महाविकास आघाडी एकजूट राहिल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजप व समर्थित आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

.          या विधानसभा क्षेत्रातील विधानसभा निवडणुकीत चढाओढीचे राजकारण सुरू असताना वरोरा येथील सर्वपक्षीय उमेदवाराने निवडणुकी करता आपली कंबर कसली आहेत आणि त्यानुसार ते कामाला सुद्धा लागले आहेत तितक्यातच, वरोरा येथील प्रस्थापित राजकारणात मागील 2019 विधानसभा निडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून ॲड. अमोल बावणे यांनी लढविली होती व त्यांच्या उमेदवारीमुळे वरोरा येथील राजकारणामध्ये बदल घडवून आला, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय माजी मंत्री संजय देवतळे भाजप सोडून ते वेळेवर शिवबंधन बाधून शिवसेनेकडून उमेदवारी लढले होते, विद्यमान आमदार प्रतिभा धनोरकर काँग्रेस आणि रमेश राजूरकर हे मनसेतर्फे निवडणूक लढले होते. येथिल लोकांमध्ये अशी चर्चा होती की 2019 च्या निवडणुकीत ॲड. अमोल बावणे यांची उमेदवारी रमेश राजूरकर यांना मिळाली असती तर शिवसेनेचे संजय देवतळे निवडून आले असते मात्र ॲड अमोल बावणे यांच्या उमेदवारी मुळे माजी मंत्री संजय देवतळे यांना नुकसान झाले व बावणे यांच्या उमेवारीमुळे विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना फायदा झाला अशी चर्चा विधानसभा क्षेत्रात सुरू होती, परत पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत ॲड. अमोल बावणे हे थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी लढवणार अशी चर्चा सुरू आहे.

.          ॲड. अमोल बावणे हे या क्षेत्रातील उच्चशिक्षित युवा उमेदवार असून ते नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असतात लोकांच्या हितासाठी ते आंदोलन उपोषण करीत असतात 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांनी विधानसभा उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटा कडून लढवली तर मागील 2019 च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी सुद्धा यांच्या उमेदवारीमुळे मोठा बद्दल बघायला मिळणार आहे, कारण येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये ॲड. अमोल बावणे हे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संपर्कात असून ते या विधानसभेमध्ये अजित पवार गटातर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता दिसून येत आहेत ॲड. अमोल बावणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार ठरले तर निश्चितच या विधानसभा क्षेत्रामधील बाकी उमेदवारांना धक्का बसण्याची शक्यता दिसून येत आहेत आणि अतिशय कमी कालावधीत जिल्हा परिषद व नंतर विधानसभा निवडणूक लढविली असून ते भोई भटक्या समाजाचे प्रदेश अध्यक्ष असल्याने त्याचे राजकीय पटलावर चांगले संबंध आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या वरोरा विधानसभा निवडणुकीत ॲड. अमोल बावणे हे काय भूमिका घेणार यांच्या कडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!