Home राजकीय मी कांदा लावला नाही ! पैसे आले इमानदारीने पैसे परत केले !

मी कांदा लावला नाही ! पैसे आले इमानदारीने पैसे परत केले !

810

पैसे आलेल्या शेतकर्यानचा खुलासा

वरोरा बाजार समितीतील कांदा प्रकरण

चंद्रपुर
.            मी कांदा लावला नाही. बाजार समितीत कधी गेलो नाही. माझ्या जवळच्या दलालाने मला सांगितले की तुझ्या खात्यात पैसे जमा झाले. मी ते पैसे खात्यातून काढले आणि इमानदारीने अर्धे पैसे त्यांना दिले. हे उत्तर आहे एका शेतकर्याचे त्या शेतकर्याखने कधी कांदा लावला नाही आणि बाजार समितीत गेला नसल्याचा ही खुलासा दैनिक नवजीवन जवळ केला.
वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकारी आणि व्यापार्यांचनी काही राजकारन्याना हाताशी धरून शासनाच्या कांदा अनुदानाची अफरातफर केली. मात्र शेतकर्यांाच्या खात्यात पैसे जमा होताच बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकारी आणि व्यापर्‍यांचा पितळ उघड पडल. कांदा अनुदानाचा मुद्दा आमदार प्रतिभा धांनोरकर यांनी पणन मंत्र्या पर्यंत पोहचला. शासनाने कांदा अनुदानाची चौकशी सुरू केल्याची माहिती शेतकर्यांाना व बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकारी आणि व्यापार्यां ना होताच सावरासावर सुरू झाली.
.            ज्या शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांचे खाते गोठविण्यात येणार असल्याची चर्चा आता वरोरा तालुक्यात पसरल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. आपल्याला मिळालेल्या अनुदानाची अर्धी रक्कम व्यापार्यांना दिली. शासनाने अनुदान परत मागितले तर कुठून द्यायचे या भीतीने शेतकरी आता व्यापार्यांना जाब विचारू लागला. आमच्या प्रतिनिधीने एका शेतकर्यानला कांदा अनुदानाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही आजपर्यंत कधीच कांदा लावला नाही. अजून पर्यंत बाजार समितीत पाय ठेवला नाही. दलालाने अचानक फोन केला आणि सांगितले की माझ्या खात्यात ३६ हजार रुपये जमा झाले. त्यापैकी १८ हजार रुपये मी त्याला ईमानदारीने परत केले.

error: Content is protected !!