Home चंद्रपुर जिल्हा विशेष मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम करा 

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम करा

1285

माजरी ग्रामपंचायतची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

माजरी : सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असलेल्या माजरी कॉलरी येथील मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली बांधकाम करावे अशी मागणी माजरी ग्रामपंचायतच्या वतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे.

.       माजरी गावातुन जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील माजरी कॉलरी येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला शालीमार ट्रेडर्स ते जावेद बुट हाऊस पर्यंत, जुना बस स्टाप ते सलीम शेख यांचे दुकानापर्यंत, अरुण सिंग (एलआयसी ऑफिस) ते गुजरात साडी सेल पर्यंत तसेच माजरी वस्ती येथील गोविंदा शेट्टी ते प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी माजरी ग्रामपंचायतीने केली आहे.

.       दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्ता मौजा माजरी-पाटाळा मार्गे जात असून सध्यास्थीतीत माजरी (कॉ) येथे रोडचे दुरुस्ती व डांबरीकरण करण्याचे काम सुरु आहे. सदर मुख्य रस्त्याला लागुनच खाली जागा असून दुकाने व हॉटेल व्यावसायिक यांचे व्यवसाय आहेत. परंतु मुख्य रस्त्याच्या बाजुने नालीची व्यवस्था नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. तसेच पावासाचे पाणी सुद्धा रोडवरून वाहते त्यामुळे नवीन बांधाकाम केलेला रस्ता लवकर खराब होऊ शकते. करिता रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी निसरा करण्यासाठी नाली करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन माजरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच छाया जंगम आणि ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गणवीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भद्रावतीचे उपविभागीय अभियंता यांना बुधवारी (दि. २७ नोव्हें.) दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!