सिंदेवाही : जगाला शांतीचा, आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पूर्वची मासिक बैठक सिंदेवाही येथील भंते शोभित मैत्रेय बुद्ध विहार येथे रविवारी संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील आठ तालुक्यामधून पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व ही संस्था मागील अनेक वर्षापासून धम्माचा प्रसार आणि प्रचाराचे कार्य, करीत असून या विभागाला मुल, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी, चिमूर, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, भद्रावती असे एकूण आठ तालुके जोडलेले आहेत.
. दर महिन्याला जिल्ह्यातील आठही तालुक्यात जिल्हास्तरीय बैठक आयोजित करून संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली माहिती बाबत सविस्तर चर्चा करणे, संस्थेला प्राप्त झालेल्या धम्मदानाचे जमाखर्च सादर करणे, नुकत्याच पार पडलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेचा अहवाल सादर करणे, समता सैनिक दल प्रशिक्षण, आणि धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त मान्यवरांना दिलेल्या मानवंदना बाबत चर्चा करणे, इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली रविवारी सिंदेवाही येथील भंते शोभित मैत्रेय बुद्ध विहार (पोलीस स्टेशन समोर) बैठक घेण्यात आली.
. यावेळी जिल्हा सरचिटणीस लोमेश खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष घनश्याम भडके, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष अनिल मेश्राम, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, हिशोब तपासनीस मंगल कोसे, जिल्हा संघटक नारायण कांबळे, विजय गेडाम, मुल तालुकाध्यक्ष अशोक रामटेके, सिंदेवाही तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस जगदीश सेमस्कर, महिला तालुकाध्यक्षा शुभांगी खोब्रागडे, तालुका संघटक महेंद्र कोवले, संघटक भीमराव खोब्रागडे, रंजना चूनारकर, प्राजक्ता खोब्रागडे, नलिनी रामटेके, दर्शना खोब्रागडे, प्रज्ञा मेश्राम, विशाखा खोब्रागडे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस जगदीश सेमस्कर, महिला अध्यक्षा शुभांगी खोब्रागडे यांचे पुढाकारातून बैठकीचे आयोजन करण्यात आले.


