मोकळ्या जागेत झेंडा उभारल्याने गदगावात दोन गटात तणाव
चिमूर : तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर झेंडा उभारण्यात आला. त्यानंतर तथागत गौतम बुद्धांची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. व त्या जागेला कुंपन करण्यात आल्याने गावातील अन्य समाजातील व्यक्तींनी विरोध केला. यावरून झालेल्या वादाने गावात तणाव वाढला असल्याने अखेर चिमूर पोलिसांनी हस्तक्षेप करीत गावात दंगानियंत्रक पथकासह बंदोबस्त वाढविण्यात आल्याने गदगावला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
. चिमूर तालुक्यातील गदगाव येथे आबादी जागेमधील भूखंड क्रमांक २८ ची लेखी मागणी एक वर्षापुर्वी बौद्ध समाजातर्फे प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. यामूळे बौद्ध समाजातर्फे या जागेवर ११ नोव्हेंबर २०२४ ला पंचशिल झेंडा उभारण्यात आला. यांनतर बुद्धमुर्ती सुद्धा स्थापन करण्यात आली. याला गावातील इतर समाजातर्फ आक्षेप घेऊन हे अतिक्रमण काढूण हि जागा मोकळी करून देण्याची लेखी मागणी करण्यात आली.
. दरम्यान प्रशासन विधानसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यावेळी या वादावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही. २७ नोव्हेंबरला गावातील महिला पुरुषांनी सदर अतिक्रमण काढण्याच्या मागणी करीता तहसील कार्यालय तथा चिमूर पोलिस स्टेशन मध्ये धडक देऊन तसे निवेदन दिले. बौद्ध समाजातर्फे देखील ही जागा आम्हाला द्यावी अशी मागील एक वर्षापासून मागणी केली होती. मात्र हिच जागा आम्हाला बौद्ध समाजाला द्यावी हाच मुद्दा धरून त्यावर अडून बसले तर हे अतिक्रमण काढावे अशी मागणी बौद्ध समाज सोडून इतर गावकरी करीत असल्याने गावात तणाव वाढला.
. ज्यामुळे रात्री पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गुरवारला सकाळी यावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, तहसीलदार श्रीधर राजमाने, गटविकास अधिकारी नितीन फुलझले, चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, मल्हारी ताळीकोटे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम नवघरे, दिप्ती मरकाम यासह चार महिला पोलिस अधिकारी, पोलीस दाखल झाले. वातावरण चिघडू नये म्हणून भिसी पोलीस स्टेशन, शेगाव पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी, बोलवण्यात आले. तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा नियंत्रण पथकही पाचारण करण्यात आले. अशा प्रकारे गदगावात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडील प्रतिनिधी सोबत ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करून तोडगा काढण्याचा अधिकाऱ्यांकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे गावात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
अतिक्रमण स्वतःच्या हाताने काढण्याकरीता नोटीस देत दोन दिवसाची मुदत देण्यात येणार असुन त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण काढण्याकरीता आदेश काढण्यात येतील. श्रीधर राजमाने, तहसीलदार, चिमूर


