ठेकेदारांनी काम पूर्णत्वास न्यावे, व पाणी पुरवठा करावा जनतेची मागणी
सिंदेवाही : तालुक्यातील रत्नापूर हे गाव जवळपास ७ हजार लोकसंख्या आणि पंधरा ग्राम पंचायत सदस्यीय असलेले गाव आहे. या गावाला रत्नापूर शिवणी रोडच्या मधुन वाहणाऱ्या उमा नदीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाच कोटीच्या वर असलेल्या रक्कमेची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली. या योजनेचे काम ठेकेदारांना देण्यात आले. आणि दीड दोन वर्षांपूर्वी याचे काम देखील सुरू झाले. त्यामध्ये संबंधीत ठेकेदारांनी फक्त एक पाण्याची टाकी अर्धवट बांधली आणि नदी काठावरील एक विहीर अर्धवट बांधली असून जवळपास एक वर्षांच्या वर कालावधी निघून गेला तरी आतापर्यंत सध्यास्थीतीत काम पूर्णपणे बंद असून, काम थंडबस्त्यात पडले असल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
. रत्नापूर या गावाला सुरळीत व व्यवस्थीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून ४०-४५ वर्षांपूर्वी तात्कालीन राज्य मंत्री यशोधरा बजाज यांनी पाणी पुरवठा योजना रत्नापूर, शिवणी मार्गावरील उमा नदीवर कार्यान्वीत केली होती. आणि तेव्हापासून आजतागायत त्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा केले जाते. आता ती योजना कशीबशी सुरू आहे परंतू उन्हाळ्यात नदीला पाणी राहत नसल्याने गावातील जनतेला पाणी पुरवठा होत नाही. आणि त्यामुळे जनतेला पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. पाणी पुरवठा योजनेला बरीच वर्ष झाल्याने जागोजागी पाईप फुटने मोटार जळणे हे प्रकार सुरु आहेत. आणि त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाला अनावश्यक खर्च करावा लागत आहे
. गावात पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने रत्नापूर या गावाला जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पाच कोटीच्या वर रुपयाची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यात नदी पात्रात एक विहीर बांधकाम, मोठी विहीर नदी काठावर बांधकाम, गावात दोन पाणी टाकी बांधकाम, तर नदीपासून गावापर्यंत, आणि गावातून नविन पाईप लाईन टाकण्याचे काम मंजुर असल्याची माहीती आहे. दोन वर्षापूर्वी या कामाचे निविदा निघुन कंत्राटदारास काम देण्यात आले.
. कामही नदी काठावरील विहीर बांधकाम व ग्रामपंचायतच्या बाजूला पाण्याची टाकी बांधकाम सुरू झाले. परंतु सध्याच्या स्थीतीत दोन्ही काम अपूर्ण असुन एक वर्षाच्या वरचा कालवधी लोटून गेला तरी पण त्यानंतर कोणतेच काम सुरू झालेले नाही. वरील दोन्ही कामे अर्धवट असून उर्वरित काम काहीच झालेले नाही. ठेकेदार कुठे गायब झाले? काहीच कळत नाही. यामुळे गावकऱ्यांच्या पाणी मिळण्याच्या अपेक्षेचा अपेक्षाभंग झाला असून, सदर योजना कधी पूर्ण होईल आणि योग्य व सुरळीत, व स्वच्छ पाणी गावाला कधी मिळेल असा संतप्त प्रश्न गावकरी विचारत आहेत.
. गावात बऱ्याच ठीकाणी पाईपलाईन नसल्याने काही भागाला सध्या पाणी पुरवठा होत नाही. आणि नदीपात्रात पाणी साठवणुक क्षमता कमी असल्याने उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो. एप्रील मे जून महिन्यात तर पाण्यासाठी रत्नापुर वासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नवीन पाणी पुरवठा योजना ही लवकर पूर्ण होईल. गावातील जनतेला पूर्ण दिवस सुरळीत पाणी पुरवठा या योजनेच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा गावकरी जनता बागळून होते. परंतू त्यांचे अपेक्षावरच पाणी गेल्याचे चित्र ठेकेदारांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून दिसुन येत आहे. त्यामुळे संबंधीत विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांनी या रत्नापूर वासीय जनतेच्या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष घालून ही पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी रत्नापूर वासीय जनता करीत आहेत.


