प्रसार माध्यमे शेतकरी व गरिबांचा मुद्दा उचलून धरत नाहीत
राहुल गांधींची प्रसार माध्यमावर आगपाखड
चंद्रपूर : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करतो, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करतात. अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चिमूर क्रांतीभूमीत केले.
![]()
. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले देशातील प्रसार माध्यमे शेतकरी व गरिबांचा मुद्दा उचलून धरत नाहीत. माध्यमांमध्ये मजूर, शेतमजूर, शेतकरी दिसत नाहीत, आदिवासी, बेरोजगारीचा विषय दिसत नाही. अंबानीचा शाही विवाह सोहळा, अदानी, क्रिकेट सामने दिसतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा २४ तास दाखविला जातो, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी माध्यमांवर आगपाखड केली.
. चिमूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. मंचावर काँग्रेसचे संघटन महामंत्री के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, चिमूरचे उमेदवार डॉ. सतीश वारजुरकर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, रिपाइंचे भूषण गवई, माजी आमदार अविनाश वारजुरकर, बल्लारपूरचे उमेदवार संतोष सिंह रावत उपस्थित होते. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करतो, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करतात.
. मुंबईतील दलित, आदिवासी, मागासवर्गीयांची वस्ती धारावीची जमीन अदानींना देण्याचा निर्णय अशाच प्रकारे बंद खोलीत घेण्यात आला. त्याच पैशातून आमदारांची खरेदी करून मोदी व सहकाऱ्यांनी राज्यातील आघाडी सरकार पाडले, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चिमूर क्रांतीभूमीत केले. तर २५ भांडवलदारांचे १६ लाख करोड रुपयांचे कर्जे नरेंद्र मोदी यांनी केले.मात्र शेतकऱ्यांचे त्यांनी कर्ज माफ केले नाही,यावरून भाजपा हा पक्ष भांडवलदारांच्या हिताचा असून शेतकऱ्यांचा विरोधक आहे. याचबरोबर लहान व्यवसायिकांना,व देशातील नागरिकांना जि.एस.टी.लागू करून बरबाद केले असल्याचेही ते म्हणाले.


