चंद्रपूर : किशोर जोरगेवार हे आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे. चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर विधानसभा अंतर्गत असलेल्या घुग्घुस येथे आयोजित किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभेकरिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी घुग्घुस येथे आले होते.
. यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आपण सर्वोत्तम डॉक्टर कोणता आहे हे पाहून त्यांच्याकडे उपचार घेत असतो. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये सुद्धा जात-पात धर्म, पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा. इतर वेळेस आपण कधीही जात पाहत नाही तर निवडणुकीच्या वेळेस आपण जात पाहून मतदान का करायचे? असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थितांना केला. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या देशामध्ये 67 योजना कार्यान्वित आहेत आणि राज्याच्याही विविध योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेत असताना कोणत्याही जात-पात धर्म, पंथाचा विचार न करता या योजना सगळ्यांना लागू केल्या जातात. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सुद्धा या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी शेवटच्या माणसाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे.
. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे, आदिलाबादचे खासदार नागेश गोडाम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष भारत गुप्ता, विवेक बोढे, आशिष माशिरकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरला मिळणार फ्लाय ओव्हर चंद्रपूरच्या वाहतूक समस्येबाबत आमदार किशोर जोरगेवार हे माझ्याशी नेहमीच चर्चा करीत असतात. या समस्येवर आपण उपाय काढावा याबाबतही त्यांनी मला बरेचदा सांगितले आहे. त्या दृष्टीने चंद्रपूरला निवडणूकीनंतर लवकरच नवीन फ्लाय ओव्हर बांधण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. पडोली समोरून बंगाली कॅम्प असा हा फ्लाय ओव्हर असणार आहे.


