Home राजकीय वारजूकरांसाठी “विजय” च्या खांद्यावर “विजयाची” धुरा

वारजूकरांसाठी “विजय” च्या खांद्यावर “विजयाची” धुरा

1314

चिमूर विधानसभा ठरत आहे हाईव्होल्टेज 

बड्या नेत्यांच्या सभानी गाजतोय परिसर

पंकज रणदिवे

    नेरी :  विधानसभेची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कसरत करत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात हल्ली भाजपचे बंटी भांगडिया हे आमदार म्हणून मागील 10 वर्षापासून सत्तेवर आहे. याआधी विजय वडेट्टीवार हे चिमूर विधानसभेतील आमदार होते. वडेट्टीवारांनी विधानसभा क्षेत्र सोडताच काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजी मुळे चिमूर विधानसभा भाजपच्या हातात गेले असल्याचे बोलल्या जात आहे.

.        मात्र 2024 मधील विधानसभा ही अत्यंत चुरशीची झालेली असून सतीश वारजुकर यांना जिंकविण्याची धुरा विजय वडेट्टीवार यांनी आपल्या हातात घेतल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी विधानसभेत होणारी गटबाजी मुळे काँग्रेस ला प्रत्येकवेळी फटका बसलेला आहे. मात्र आता परिस्थीत बदलली असून काँग्रेस मधील गटबाजी थांबलेली पाहावयास मिळत असल्याने काँग्रेस विजयासाठी आतुर दिसत आहे.

.        दिनांक 12 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर विधानसभेत येऊन परिसरील चिमूर, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, चंद्रपूर, हिंगणघाट, उमरेड, भंडारा, वरोरा येथील भाजपचे उमेदवारांकरीत  लोखोंच्या जनसमुदायात हुंकार भरून काँग्रेस वर प्रहार केला. मात्र याच प्रहारावर काँग्रेसने एका जिल्हा परिषद सदस्याला हरवीण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांना चिमूर क्षेत्रात यावे लागत असल्याने काँगेस मजबूत स्थितीत असल्याचे काँग्रेसकडून बोलल्या जात आहे.

.        त्यातच दिनाक 15 ला काँगेस चे दिग्गज नेते राहुल गांधी हे सुद्धा चिमूर विधानसभा क्षेत्रात हुंकार भरणार आहे. व त्या सभेत वडेट्टीवार यांचे सह काँगेस चे दिग्गज नेते हजर राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.

.        या काँग्रेस चा जुना बालेकिल्ला असलेल्या चिमूर विधानसभा मध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हस्तक्षेप करून वारजूकरांचे विजयासाठी जोरदार प्रचार सुरू केल्याने काँगेस चे उमेदवार यांना निवडून आणण्याची जबाबदारीच ही विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे चिमूर विधानसभा निवडणुक चुरशीची झालेली असून वारजुकरांसाठी “विजय” च्या खांद्यावर विजयाची धुरा असे म्हणजे वावगे ठरणार नाही.

error: Content is protected !!