गडचांदुर : माणिकगड येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून बैलमपूर,मानोली व नोकारी या तीन गावात विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५८ विद्यार्थिंनींचे हिमोग्लोबीन तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला.
. या शिबिरादरम्यान डॉक्टर स्नेहा मोते यांनी सांगितले कि, आजच्या खानपाणामुळे व दगदगीमुळे किशोर वयीन मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीन चे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते व त्यामुळे त्यांना अनेमिया ,सिकलसेल तसेच मासिक पाळीतील आजार होऊ शकतात,जर योग्य वेळी त्यांची तपासणी करून जर औषोधोपचार केलात तर त्यांचा या आजारांपासून बचाव होऊ शकतो. यावेळी माणिकगढ कडून सर्व किशोरी मुलींना हिमोग्लोबीन वाढीसाठी आई रॉन व मल्टीव्हीटॅमिन टॉनिक देण्यात आलेत. या शिबिरात शासकीय रुग्णालय देवाडा येथील डॉक्टर व कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


