लाडक्या बहिणी योजनेचे आर्थिक सहाय्य वाढवू – फडणवीस
चंद्रपूर येथे जाहीर सभा
चंद्रपूर : शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजवरचा इतिहास बघितला तर त्यांनी कोणताही प्रकल्प पूर्ण केला नाही, असा दावा भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस हे स्थानिक भाजपचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारसभेसाठी चंद्रपुरात आले होते. महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ कोहिनूर तलाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सभेला संबोधित करताना फडणवीस बोलत होते.
. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले कि, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी भाव मिळाल्यास त्यांच्यासाठी आर्थिक सुरक्षेचे जाळे उभारण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना, विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येत असून, त्यासाठी 12 तासांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित केला जाईल. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
. राज्य परिवहन (एसटी) बसमधील महिला प्रवाशांसाठी 50 टक्के भाडे सवलतीचा उल्लेख केला. ही योजना लागू झाल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली असून, तोट्यातील राज्य परिवहन महामंडळ आता नफ्यात आले आहे. ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात मासिक 1,500 रुपये जमा करत आहे, आणि या पुढे हे आर्थिक सहाय्य वाढवून 2,100 रुपये केले जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
. ना. फडणवीस म्हणाले कि, आमदार जोरगेवार यांनी विकासकामांना मानवीय चेहरा दिला.अम्मा का टिफिन उपक्रमातून ते गरजवतांच्या जेवणाची सोय करत आहे. आम्ही नागपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तेव्हा चंद्रपूरच्या दिक्षाभुमीलाही निधी हवा यासाठी आग्रही जिद्द करुन त्यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून घेतली. यातील पहिला टप्पा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी 240 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मिळविला पूढल्या वर्षी होणार असलेल्या माता महाकाली महोत्सवामध्ये परिसराचा चेहरा बदलेला असेल होणार असलेली ही सर्व विकासकामे आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्यामुळेच शक्य झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले
. यावेळी उमेदवार आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, अनु. जमातीचे चेअर मॅन फग्गनसिंग फुलस्ते, श्रीनिवास गोमासे यांची उपस्थिती होती. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, नागेश मोडाम, विधानसभेचे संयोजन प्रमोद कडू, माजी महापौर राखी कंचर्लावार, ज्येष्ठ नेते विजय राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, राष्ट्रवादी कोंग्रेस अजित पवार गट ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.


