Home चंद्रपुर जिल्हा विशेष सिंदेवाही शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

सिंदेवाही शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

1333

दुचाकीस्वारांच्या अपघातात झाली वाढ

नगरपंचायत कार्यालयाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

सिंदेवाही : शहरातील मुख्य रस्त्यावर जुना बस स्टँड येथे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून या उपद्रवी कुत्र्यांमुळे दुचाकी गाड्यांच्या अपघातात वाढ होण्याबरोबरच बाजार लाईन मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने नगरपंचायत कार्यालयाने तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

.      सिंदेवाही शहरात सद्या बेवारस कुत्र्यांची झुंड मुख्य मार्गावर फिरत असून ये जा करणाऱ्या दुचाकी गाड्यांना आडवी येऊन अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. तर काही दुचाकीस्वरांना दवाखान्यात भरती व्हावे लागले आहे. सिंदेवाही शहरात येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायत कार्यालयाने अशा बेवारस आणि भटक्या कुत्र्यांना पकडून बाहेर नेऊन सोडून द्यावे. किंवा मोठी दुर्घटना होण्या अगोदर नगरपंचायतचे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या मोकाट कुत्र्यांचा युद्धपातळीवर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!