चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी नामांकन अर्ज दाखल केला. जोरगेवार यांच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली. जोरगेवार शक्तिप्रदर्शनाची चंद्रपुरात चर्चा होती. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले.
![]()
. यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, प्रकाश देवतडे, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, सलीम शेख, राशिद हुसेन, सविता दंढारे, सायली येरणे, विमल काटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


