Home विशेष तेलाचा दर वाढतो ; सोयाबीनचा मात्र नाही

तेलाचा दर वाढतो ; सोयाबीनचा मात्र नाही

1319

हमीभावाचे काय

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार केव्हा?

वरोरा : सोयाबीन मळणीची धांदल सुरू आहे. पावसाच्या कचाट्यातून सोयाबीन सुरक्षितपणे घरी आणण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. नेमके याचवेळी सोयाबीन गोडेतेलाचा दर भरमसाट वाढला आहे. मात्र त्याचवेळी पिकवलेल्या सोयाबीनला मात्र दर का नाही, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे.

.       कापुस पीका पाठोपाठ सोयाबीन पीक हा आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. संपुर्ण वरोरा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे पीक घेतले जाते. पण दुर्दैवी बाब म्हणजे सोयाबीनच्या दराबाबत मात्र शेतकऱ्यांची खूप वाताहत होत असते. या सोयाबीनपासून प्रामुख्याने गोडेतेल प्रचंड प्रमाणात बनवले जाते. त्याचा मोठ्या प्रमाणात खूप आहे. याचबरोबर ब्रेड, जिस्किटे, नानकटाई, केक, शेव, चकली, मिसळदेखील बनवतात, पनीरला पर्याय म्हणूनही सोया पनीर वापरतात, प्रामुख्याने वापर होणाऱ्या सोयाबीन गोडेतेलाच्या १५ किलोच्या एका डब्याची किंमत १७०० रु. वरून थेट २२५० रु. पर्यंत गेली आहे. ही बाद अलीकडेच म्हणजे सोयाबीन मळणी चालू असतानाच झाली आहे, त्यामुळे त्याची तुलनात्मक चर्चा ग्रामीण भागात आहे. ही दरवाढ एक किलो तेलाला ११३ रु. वरून थेट १५० रु. इतकी केली आहे.

.       याचवेळी इतके परिश्रम घेऊन पिकवलेल्या सोयाबीनला विक्रमी दर मात्र फक्त ४ हजार रु. क्किंटलच्या आसपास आहे. त्यात आणखी ओलावा तपासणी नावाचे प्रकरण असे आहे. हा दर साडेतीन हजारपर्यंतदेखील खाली येत आहे. या दराबाबत व्यापा-यांची मनमानी आहे. कोणतेही व कोणाचेही नियंत्रण याबाबत नाही, त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांने कष्ट करायचे व उत्पादन आले की, मात्र कवडीमोल दराने ते विकायचे हे दुर्दैव बळीराजाच्या पदरी आहे.

error: Content is protected !!