Home चंद्रपुर जिल्हा विशेष कोठारीतील राष्ट्रीय महामार्ग बनला जीवघेणा

कोठारीतील राष्ट्रीय महामार्ग बनला जीवघेणा

1297

रस्त्यावर, पुलावर खड्डेच खड्डे

लोकप्रतिनिधींची उदासीनता

कोठारी : बल्लारपूर ते आल्लापल्लीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोठारी या गावातून गेला आहे. या गावातुन जात असलेला रस्ता व नाल्यावरील पूल जीवघेणा बनला आहे. रस्त्यावर, पुलावर खड्डेच खड्डे असून दुरवस्था झाली आहे. जीवघेणे खड्डे व वाहनांमुळे उडणारी धूळ यामुळे वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे व पुलावरील निघलेल्या लोखंडी सळखी दररोज अपघाताला आमंत्रण देत आहेत.

.      राष्ट्रीय महामार्गाचे काम व कोठारी गावाजवळील नाल्यावरती नवीन पुलाचे बांधकाम होऊन मागील तीन वर्षापासून रहदारीसाठी बंद आहे. परंतु जुन्या पुलावरून वाहतूक नियमित चालू असून त्या रस्त्याची अवस्था ही खूप दयनीय, बिकट व दुर्घटना घडण्याचे स्थळ बनले आहे. त्या रस्त्यावर रोज हजारो प्रवासी,अवजड वाहनांची वर्दळ आहे. तसेच सुरजागड प्रकल्पाचे रोज हजारो ट्रक दिवस-रात्र आवक जावक चालू असंतात. परंतु रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की खोल खोल खड्डे पडले असून आजूबाजूला अर्धा फूट खड्डे व पाणी साचलेले असते. त्यामुळे अनेकांना गाडी चालवताना जीव धोक्यात टाकून त्या रस्त्यांवरून येणे जाणे करावे लागत आहे. कोठारी गाव शिक्षण व मिरची व्यवसाया करिता विदर्भात प्रसिद्ध असून हजारो लोक येतात तरीही शासनाने या रस्त्याकडे पाठ फिरवली असून मागील तीन वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम परिपूर्ण केले नसल्याने हजारो लोकांच्या जीवांशी जीवघेणा खेळ चालू आहे. मात्र महामार्ग बांधकाम प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नादुरुस्त रस्त्याची तसेच पुलावर निघालेल्या सळाखी व खड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावे व लोकांच्या जीवाशी खेळ बंद करावा अन्यथा कोणत्याही निरपराध व्यक्तीच्या जीव गेल्यास महाराष्ट्र शासन व रस्ता बांधकाम विभाग हे जबाबदार राहणार आहेत. जर असे काही घडल्यास येणाऱ्या काळामध्ये कोठारीकर आंदोलनाची भूमिका घेणार आहे. तरी लवकरात लवकर जुना रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

जमीन हस्तांतरणाचा प्रश्न रेंगाळतो                                                                                                                                                      कोठारी नाल्यावर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने नवीन पुलाची निर्मिती मागील तीन वर्षांपूर्वी केली आहे. मात्र या पुलाला जोडणारा रस्ता बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आवश्यक मोबदला देऊन हस्तांतरित करणे गरजेचे आहे. जमीन देण्यास शेतकऱ्यांची ना नाही मात्र त्याचा मोबदला योग्य दिला जात नसल्याने हस्तांतरण थांबले आहे. या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या अगोदर याच शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याचे बांधकामासाठी घेण्यात आल्याने केवळ जमिनीचे तुकडे उरले असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्यास त्यातून दुसरी जमीन खरेदी करून त्यातून आपली उपजीविका भागविणार आहेत. या भागात शेतीचे दर आकाशाला भिडले असून तुटपुंज्या मोबदल्यातून शेती खरेदी करणे शक्य नसल्याने शेतकरी महामार्ग रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार नासक्याचे समजते.

लोकप्रतिनिधींची उदासीनता                                                                                                                                                                 राष्ट्रीय महामार्गाचे व पुलाचे काम होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता या क्षेत्राचे आमदार,खासदार यांनी हस्तक्षेप करून ही समस्या निकाली काढायला पाहिजे होती.या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले,कुटुंब उद्धवस्त झाले तरीही लोकप्रतिनिधींना जाग आली नाही.रखडलेल्या रस्त्यामुळे आम नागरिकांच्या जीवाशी खेळखंडोबा सुरू आहे.लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे रस्त्याच्या विकासा ऐवजी भकास झाला असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांत उमटत आहेत.

error: Content is protected !!