Home चंद्रपुर जिल्हा विशेष गडबोरीत दहा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ

गडबोरीत दहा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ

1302

गावातील मध्यभागात दिवसाढवळ्या शेळीची शिकार

बिबट्याच्या दहशतीने गावात भीतीचे वातावरण

सिंदेवाही : मागील दहा दिवसांपासून गडबोरी गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून गावातील मध्यभागात दिवसाढवळ्या शेळ्या, बकऱ्या ठार करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये वाघाच्या दहशतीची भीती निर्माण झाली आहे.

.       सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरी येथे मागील दहा ते बारा दिवसापासून बिबट्याने गावात धुमाकूळ घातला आहे. गावातील मध्यभागात असलेल्या मोरेश्वर कामडी, लोकेश नंदनवार यांचे घराजवळ बिबट्याने दिवसाढवळ्या अनेक शेळ्या ठार केल्या असून गावात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी गावातीलच एका बकरी चारणाऱ्या मुलाच्या मागे बिबट्याने पाठलाग केला होता. मात्र वेळीच त्या मुलाने त्याठीकानाहून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला आहे. मात्र वनविभाग या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सूरज कोडापे यांनी माध्यमांना दिली आहे. मोरेश्वर कामडी यांचे घराजवळ बिबट्याने शेळीला ठार मारले. तेव्हा रोखठोकचे सूरज कोडापे यांनी स्थानिक क्षेत्र सहाय्यक यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची खंत सूरज कोडापे यांनी व्यक्त केली आहे. गडबोरी या गावात वाघाची, बिबट्याची नेहमी दहशत सुरू असते. त्यामुळे येथील वनविभागाने सतर्क असणे गरजेचे आहे.

.       मात्र गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना, आणि त्याबाबतची माहिती वनविभागाला देण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कर्मचारी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने गावकऱ्यांनी रात्रभर फटाके फोडून बिबट्याला गावाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला आहे. बिबट्याने मागील दहा ते बारा दिवसापासून गावाशेजारी बस्थान मांडले असून दिवसाढवळ्या गावातील शेळ्या फस्त करीत असल्याने गावकऱ्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज कोडापे यांनी गावकऱ्यांच्या वतीने केली आहे.

error: Content is protected !!