Home चंद्रपुर जिल्हा विशेष विजेच्या धक्याने शेतमजूर महिलेचा मृत्यू : एक गंभीर

विजेच्या धक्याने शेतमजूर महिलेचा मृत्यू : एक गंभीर

1285

शेतीच्या कुंपणाला सोडला होता विद्युत प्रवाह 

सावरगाव शेत शिवारातील घटना

नेरी : शेत पिकाच्या रक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कंपाऊंडला विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेतात गेलेल्या महिलांना विजेचा धक्का लागला. यात एक शेतमजुर महिला जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना चिमुर तालुक्यातील सावरगाव येथे 19 ऑक्टोबर ला सकाळच्या सुमारास उघडीस आली. सदर घटनेने सावरगाव गावात शोककळा पसरली आहे. सुंदराबाई चौधरी (65) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर कमलाबाई नन्नवरे (60) असे गंभीर जखमी चे नाव आहे.

.         सध्या शेतीचे हंगाम सुरू असून धानातील लांबा कापण्याचे काम सुरू आहे. अशातच सावरगाव येथील शेतकरी ताराबाई घुघुस्कर (49) यांनी आपल्या शेतातील लांबा काढण्यासाठी व गवत कापण्यासाठी दोन महिलांना मजुरीने बोलविले होते. शेतमालक ताराबाई घुघुसकर यांनी वन्य प्राण्यांच्या उपद्रव्या पासून आपल्या शेताचे रक्षणासाठी ताराचे कंपाऊंड केले होते तसेच रात्रीच्या पाळीत  त्यावर विद्युत प्रवाह सोडला जात होता. व सकाळीस बंद केल्या जात असल्याची चर्चा आहे. मात्र आज सकाळी विद्युत प्रवाह बंद करण्याचे शेतमालकाच्या लक्षात आले नसल्याने विद्युत प्रवाह सुरूच राहिला. दरम्यान सकाळच्या सुमारास दोन महिला मजूर यांनी शेतात प्रवेश करताच  महिला मजुरांचा त्या विद्युत प्रवाह असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने मजुरांपैकी सुंदराबाई चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी महिला कमलाबाई नन्नवरे ह्या गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

.         सावरगाव येथील शेती श्रीहरी अत्राम यांची असून ती शेती ताराबाई घुघुसकार ह्य भाड्याने करतात अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन ला मिळताच पोलिस निरीक्षक बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अजय चौधरी, फुलेकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण प्रकरणांची चौकशी करून मृत्तकाचे पंचनामा करून प्रेत उत्तरणीय तपासणी करीता चिमूर उपजिल्हारुग्णालय येथे पाठविण्यात आले तात्काळ आरोपी शेती मालक ताराबाई घुगुस्कर हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास फुलेकर व अजय चौधरी पीएसआय करीत आहेत.

error: Content is protected !!