नवीन बस फेरी सुरु झाल्याने विद्यार्थी व प्रवाश्यांत नवचैतन्य
नागरिकांच्या स्वागताने भारावले वाहक चालक
नेरी : चिमूर आगाराची चिमूर मार्गे नेरी सिरपूर बोथली सोनापूर तळोधी आरमोरी गडचिरोली ही नवीन बस फेरी दि 19 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली. सदर फेरी ही शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच गडचिरोली ला सरळ जाण्यासाठी व नियमित प्रवाश्यासाठी सोयीचे असल्याने या परिसरातील नागरिकांना आनंद झाला असून सदर बस बोथली चौरस्त्यावर येताच बस थांबवून बसची विधिवत पूजा अर्चा करून वाहक व चालकाचे पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी प्रवाशी विद्यार्थी नागरिक महिला पुरुष मोट्या संख्येने उपस्थित होते.
. चिमूर वरून या मार्गाने सरळ जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हती अनेकांना वैधकीय, शासकीय वयक्तिक कामासाठी जाण्यासाठी बस नसल्याने या परिसरातील सरपंच तसेच नागरिक गुरुदेव भक्त आणि हभप एकनाथ बोरकर महाराज यांनी जोरदार मागणी करून हा मार्ग प्रवाश्यासाठी व उत्पन्नाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे समजवून सांगितले असता आगार प्रमुख मेहेर, वाहतूक प्रमुख मुन यांनी सदर फेरी सुरू केली. त्यामुळे या फेरीतील गावागावातील विद्यार्थ्यांना ही बस नवसंजीवनी ठरणार आहे. त्पयामुळे परिसरात नवचैत्यन्य निर्माण झाले व बसचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी चालक रवींद्र सिडाम व वाहक प्रवीण गव्हारे यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले
. यावेळी बसची पूजा अर्चा करताना व स्वागत करताना ओमकार सहारे, हभप एकनाथ बोरकर, हभप उत्तम ननावरे, शिवचरण सहारे, श्याम शिवरकर, सुभाष बारेकर, जीवनदास दिघोरे, मंगेश भानारकर, पो पा राजेंद्र भानारकर, सरपंच जयपाल गावतुरे, संजय बोरकर, रमेश कुंभरे, अजय नागपुरे, परवीन पठाण, वैशाली चौखे, माणिक सहारे, तुळशीराम दडमल, राईबाई मेश्राम, वच्छला चौधरी, सुभाष नागपुरे, साजिद पठाण आदी सह अनेक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.


