Home चंद्रपुर जिल्हा विशेष चिकणी येथील सरपंचाकडून तलाठी व ग्रामसेवकाला मानसिक त्रास

चिकणी येथील सरपंचाकडून तलाठी व ग्रामसेवकाला मानसिक त्रास

1344

खोटी तक्रार देऊन खंडणी वसूल करण्याचा प्रकार

गावकर्‍यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

वरोरा : तालुक्यातील चिकणी  साज्यारावरील कार्यरत असलेले तलाठी व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध खोटी तक्रार देऊन मानसिक त्रास देत असल्याचे सरपंचाविरुद्ध थेट तक्रार उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे कडे गावकर्‍यांनी एका निवेदानातून उपविभागीय अधिकारी वरोरा यांना केली आहे.

.       या निवेदनात म्हटले आहे की, चिकणी येथील सरपंच हे रेती तस्कर आणि अवैध दारू विकणाऱ्यांना पाठीशी घेऊन गावामध्ये शांतता भंग करण्याचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंच हा गावातील प्रथम नागरिक समजल्या जाते. मात्र गावातील दारू विक्रेते व रेती तस्करांना नेहमी पाठीशी घालतात. कर्मचाऱ्यांची काही कारण नसताना सुद्धा सतत तक्रार करीत असून सरपंचाची गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तलाठी व ग्रामसेवक नियमित सेवेत असतात नेहमी सार्वजनिक व सामाजिक कार्यात सहभागी असतात. अशा तलाठी व ग्रामसेवक यांची तक्रार त्यांची खंडणी वसूल करण्याचा एक भाग असून आम्हाला मानसिक त्रास देत आहे गावातील ग्रामस्थांना दारू पाजून आमच्या नावाने खोटी तक्रार करून त्यांच्याकडून सह्यानिशी निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असतात. त्या ग्रामस्थांना बोलावून बयान नोंदविण्यात यावी गावांमध्ये दारू विक्री व गावातून सर्रास रेतीचे हायवा या माध्यमातून चिकणी येथील सरपंचाला हाताशी धरून रेती चोरीचा प्रकार सुरू असतात याला आळा घालण्याकरता साज्याचे तलाठी के. एस. आत्राम सदैव प्रयत्नशील असतात त्यांनी याबाबत दंडात्मक कार्यवाही सुद्धा केलेली आहे यामुळे तलाठी व ग्रामसेवकाला मानसिक त्रास देणार्‍य  सरपंचावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना दिलेल्या निवेदनात  केली आहे.

.       निवेदन देताना चिकणी ग्रामपंचायत चे उपसरपंच किशोर झाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन येडेकर, संगीता मेश्राम, नलिनी ताजणे, मनीषा दातारकर व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!