Home सामाजिक माजरीत तेलगू भाषिक महिला जोपासतायत तेलंगाणातील बतुकम्मा उत्सवाची परंपरा

माजरीत तेलगू भाषिक महिला जोपासतायत तेलंगाणातील बतुकम्मा उत्सवाची परंपरा

1339

दक्षिण भारतीयांचा लोकआस्थेचा पर्व “बतुकम्मा” उत्साहात 

माजरी : तेलंगाणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतुकम्मा उत्सवाची परंपरा माजरीतील महिला जोपासत आहेत. पित्रूमोक्ष अमावस्येला सुरू होणार्‍या या सणाची तिथीनुसार दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी सांगता केली जाते. हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून सातत्याने तेलंगाणा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा सण फक्त तेलंगाणातच साजरा केला जातो. दरम्यान काकतीया साम्राज्याच्या काळात काकतीयाच्या राजाला मुलगी जन्माला आल्यावर सर्व देवांत बतुकम्मा म्हणून तिला आशीर्वाद देण्यात आले. बतुकम्मा याचा अर्थ दीर्घायुष्य असा होतो. बतुकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडी वर विविध प्रकारची फुले ठेवून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो. सजविलेल्या फुलांना बतुकम्मा म्हणतात.

.     दरम्यान तेलंगाना राज्याला महाराष्ट्रातील काही जिल्हे लागून असल्यामुळे विशेषत: औद्योगिक भागात तेलगू भाषिक लोक रोजगारामुळे मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे. दरम्यान भद्रावती तालुक्यातील माजरी गाव हा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा खाणी असल्यामुळे दक्षिण भारतीयांसह देशातील विविध राज्यातील नागरिक येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे वेकोलि माजरी परिसरात नवरात्रीनिमित्त “बतुकम्मा” हा फुलांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

.     तेलुगूमध्ये ‘बतुकम्मा’ म्हणजे ‘माता देवी जिवंत हो’. बतुकम्मा हा एक सुंदर फुलांचा गठ्ठा आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या अनोख्या हंगामी फुलांची मांडणी केली जाते, त्यापैकी बहुतेक औषधी मूल्यांसह, मंदिराच्या गोपुरमच्या आकारात सात थरांमध्ये सजवला जातो. बतुकम्माची व्यवस्था करण्यासाठी सहसा घरातील पुरुष त्यांच्या आई आणि बहिणींना वन-वन फिरून फुले आणतात.

.     ऐतिहासिकदृष्ट्या, बतुकम्माचा अर्थ “जीवनाचा उत्सव” असा होतो. हे तेलगू भाषिक प्रदेशातील स्त्रीत्वाचा उत्सव देखील चिन्हांकित करते, ज्या दरम्यान तेलंगणातील स्त्रिया दागिने आणि इतर सामानांसह पारंपारिक साड्या परिधान करतात. पोशाखातील पारंपारिक कृपा बाहेर आणण्यासाठी किशोरवयीन मुली दागिन्यांसह लंगा-ओणी, लेहेंगा चोली घालतात. त्यामुळे उत्सवात सहभागी मुलीं आपल्या या विशेष परिधानामुळे आकर्षणाचा केंद्र ठरते.

.     दरम्यान नऊ दिवस बतुकम्माचा छोटेखानी उत्सव साजरा केल्यानंतर गुरुवारी सद्दूला बतुकम्माच्या दिवशी संध्याकाळी, स्त्रिया आपापल्या बतुकम्मास निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवून आणि फुलांभोवती डीजेच्या तालावर नृत्य सादर केले. दरम्यान तीन ते चार तास फुलांभोवती नाचल्यानंतर ते बतुकम्मास उचलून आणि डोक्यावर ठेवून ते फुले जवळच्या शिरणा नदीत घेऊन जावून विधीवत पूजन करून विसर्जित केले. दरम्यान बतुकम्माला विसर्जन केल्यानंतर प्रसाद वाटप करून दक्षिण भारतीयांचा या लोक महोत्सवाची सांगता करण्यात आली. या उत्सवादरम्यान माजरीतील सर्व नागरिकांच्या सहयोगी भावनामुळेच मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात बतुकम्मा सण यशस्वीरित्या साजरा करण्यात येत आहे.

error: Content is protected !!