भद्रावतीत आक्रोश मोर्चाचे आयोजन
आदिवासी संघटनेची पत्रपरिषदेत माहिती
भद्रावती : शहरात एका सात वर्षीय आदिवासी मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निलेश चटपल्लीवार ऊर्फ नाना चटपल्लीवार (३७) याला भद्रावती पोलीसांनी अटक केली आहे. जिल्ह्यात अत्याचार व विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असुन या घटना अतिशय निंदनीय व घृणास्पद आहे.या घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटनेतर्फे वृंदावन सभागृहात घेण्यात आलेल्या एका पत्रपरिषदेतून करण्यात आली आहे.
. या घटनेच्या विरोधात दिनांक १४ आक्टोबरला सकाळी ११ वाजता शहरातील नागमंदिर पासून तहसील कार्यालयापर्यंत एका आक्रोश मोर्चाचे आयोजन करुन मुख्यमंत्री तथा अन्य पदाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत आदिवासी संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती सदर पत्रकार परीषदेतून देण्यात आली आहे. या मोर्चात सर्व आदिवासी बांधवांनी व संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी केले आहे. सदर पिडीत अल्पवयीन आदिवासी मुलगी ही अत्यंत गरीब असल्याने एकाही नेत्याने किंवा संघटनेने या घटनेची दखल घेतली नसुन आतापर्यंत कोणिही या कुटुंबाची साधी भेटसुध्दा घेतली नसल्याची खंत पत्रपरिषदेतून व्यक्त करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यासोबतच राज्यातसुध्दा महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असुन याला सर्वस्वी राज्य सरकारची शिथील निती जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
. सदर आयोजीत केलेला आक्रोश मोर्चा हा शहरातील भद्रनाग मंदिरापासून निघुन बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दारापासून तो तहसील कार्यालयात जाईल व तेथे निवेदन सादर करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रपरीषदेला आदिवासी नेते रमेश मेश्राम, माजी नगरसेवक अड.प्रमोद गेडाम, गोलू गेडाम,संदीप कुमरे, माजी नगरसेविका अनीता गेडाम,शितल गेडाम,विद्या किनाके,रामु गेडाम,पिंटू मरसकोल्हे, पूरब गेडाम, राजू गेडाम आदी ऊपस्थीत होते.


