मुल : मागील २०२३-२४ वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठी नुकसान झाली होती. व १४ हजार शेतक-यांनी पी.एम. पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता. त्याचवेळेस सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात पीक विमा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी केली असता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व शासनाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विम्याचे पैसे मिळतील असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र ते साक्षात खोटे ठरले. शेवटी ४ आक्टोबर २०२४ चा शासनाचा निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. यात हजारच्या वर संख्येने शेतकरी उपस्थित झाले.त्यांचे समक्ष आपल्या हक्कासाठी संघर्ष करुन लढा दिल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही.अन्यथा पुढच्या पिढीला सत्ताधारी गुलाम बनवतील असा खणखणीत इशारा संतोष सिंह रावत यांनी शेतकऱ्यांना देत घरकुल, स्टॅम्प पेपर महागाई, गॅस सिलेंडर,आईच्या दुधावर GST, विद्युत बिल वाढ, सिमेंट वाढ कशी क केली याबाबतही मार्गदर्शन करताना दिला.
. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही लोकसभेला सुधीर मुनगंटीवार यांना जेवढ्या मतांनी पाडले त्याही पेक्षा जास्त मतांनी विधानसभेला पाडावे. असे मत व्यक्त केले. बाजार समिती सभापती राकेश रत्नावार सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला. मंचावर जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर, राजू मारकवार, अखिल गांगरेड्डीवार, प्राचार्य बंडू गुरनुले, सरपंच प्रीती भांडेकर, अॅड. हिमानी वाकुडकर, लीना फुलझेले, फर्जणा शेख, मुरली पाटील बेंबाळ व अनेक शेतकरी यांनी शासनावर व पालक मंत्र्यांवर टीका करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. पीक विम्या संदर्भात न्यायालयीन दाद मागणीसाठी पुढील कार्यवाही बाबत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड अजित लाभे यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मुल यांचे मार्फतिने देण्यात आले.
. प्रास्ताविक कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी शेकऱ्यांवर आलेली आपत्तीचे उदाहरण देत समजाऊन सांगितले. मंचावर बल्लारपूर तालुका अध्यक्ष, व भास्कर माकोडे, पोंभुरना अध्यक्ष वासुदेव पाल, ओमेश्र्वर पदमगिर्वार, अशोक गेडाम, बुरांडे, कृषी बाजार समिती संचालक संदीप कारमवार, किशोर घडसे, सुमित आरेकर, सूनील गुज्जनवार, लहू कडस्कर, योगेश शेरकी, चंदा कामडी, सभापती पुरुषोत्तम भुरसे, सीमा भासरकर, प्रशांत उराडे, युवक अध्यक्ष पवन निल्मवार, ओबीसी सेल गुरुदास चौधरी, रूमदेव गोहने, शांताराम कांमडे, व्यंकटेश पुलकवार, सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नलिनी आडपवार, शामला बेलसरे, समता बांसोड, अनेक ग्रा.पां.सरपंच, उपसरपंच, सोसायटी अध्यक्ष, सदस्य, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य महिला, युवक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.


