नेरी : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या कार्यावर प्रेरित होऊन मोटेगाव, खुटाळा येथील अनेक कार्यकर्त्यानी आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत दि 3 ऑक्टोबर ला भाजप मध्ये प्रवेश केला. आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे करून गावागावात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले. जनसामान्यांचे दिन दुबळ्या जनतेच्या हाकेला धावून त्यांचे कामे पूर्ण केली यामुळे अनेक पक्षातील कार्यकर्ते त्यांच्यावर प्रभावित होऊन भाजपाला पसंती देत आहे.
. यावेळी भाजप मध्ये मोटेगाव येथील मनोहर भोयर, नितेश खोब्रागडे, गणेश खोब्रागडे, देवानंद बोरकर, अंबादास बोरकर, मंगेश पाटील, दादा कुंभले, माजी सरपंच धडकू शेंडे, संदीप घोडमारे, राजेंद्र बारसागडे, शामराव पाटील, महादेव खोब्रागडे व खुटाळा येथील तुकाराम शेंडे यांनी प्रवेश केलेला आहे.
. या प्रसंगी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, जेष्ठ नेते डॉ दिपक यावले,युवा मोर्चा प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार, संजय राचलवार,संजय नवघडे,घनश्याम असावा संदीप पिसे, पिंटू खाटीक,सुधीर दंदे, गोलू मालोदे विलास कोराम यशवंत अडसोडे आदीसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


