बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई
एक आरोपीला केली अटक
विसापूर : बल्लारपूर शहरातील कन्नमवार वार्डातील एका घरी अवैध दारु साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना सहा पेट्या विदेशी दारुच्या आढळून आल्या. त्याची किंमत ८९ हजार २८0 रुपये आहे. ही कारवाई बल्लारपूर पोलिसांनी सोमवार (दि.23) रोजी रात्री ९ वाजता दरम्यान केली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपीचे राकेश कुमारस्वामी सुरमवार (37) रा. कन्नमवार वार्ड बल्लारपूर असे नाव आहे.
. बल्लारपूर शहरात अनेक परवानाधारक दारूचे दुकान आहे. मात्र,दारूबंदी काळात अनेकजण अवैध दारु विक्रीच्या व्यवसायात समोर आले. दारुबंदी हटली.परंतु काही जण अवैध दारु विक्रीच्या व्यवसाय करीत आहेत. याच अनुषंगाने बल्लारपूर पोलिसांनी बल्लारपूर पोलिसांना कन्नमवार वार्डातील राकेश सुरमवार व त्याचा भाऊ सुरज सुरमवार यांच्या घरी अवैध दारु साठा असल्याचे पोलिसांना माहित झाले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी सहा विदेशी दारू पेट्या आढळून आल्या. पोलीस घराची झडती घेत असताना राकेश चा भाऊ सुरज सुरमवार पसार झाला. पोलिसांनी पंचासमक्ष घटनेचा तपास करून ८९ हजार २८0 रुपये किंमतीचा अवैध दारू साठा पकडून आरोपीला अटक केली.
. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह, गजानन डोईफोडे, सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले,सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, अनिता नायडू,लखन चव्हाण यांच्या पथकाने केली. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


