Home चंद्रपुर जिल्हा विशेष माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्‍याविणा आजारी

माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्‍याविणा आजारी

1332

एक डॉक्टर सांभाळतो 22 गावांचा धुरा

आरोग्य सेवेचे तीन तेरा

माजरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारीची पद गेल्या महिनाभरापासून रिक्त आहेत.  एकच डॉक्टर असल्याने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावांतील ३० हजारांच्या वर ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंडासह त्रास सहन करावा लागत आहे.

.       ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. चिकित्सा घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. सद्या बीएएमएस (आयुर्वेदिक ) डॉक्टरच्या भरश्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. याशिवाय रुग्णांना देखील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकच डॉक्टराच्या उपचारांवर निर्भर राहावे लागत आहे. दरम्यान माजरी येथे मागील एक वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा ढेपाळली असल्याने येथील नागरिकांना खाजगी डॉक्टरकडून सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

.       प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये दररोज १०० च्या जवळपास रुग्णांची संख्या होती. मात्र मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. यामध्ये डेंगू, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे. दरम्यान डॉक्टर नसल्याकारणाने डेंगू, चिकन गुनियाने आजार झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याऐवजी वणी, वरोरा व भद्रावतीच्या खासगी दवाखान्यात जावून उपचार घ्यावं लागत आहे. सध्या दररोज एकच डॉक्टर ओपीडी सांभाळत आहे. गंभीर रुग्ण व अपघातग्रस्त रुग्णांना पुरेशा सोयी अभावी केवळ प्रथमोपचार करून भद्रावती किंवा चंद्रपूरला पाठविण्याचा सल्ला कार्यरत डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

.       दरम्यान संबंधित विभागाच्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांना येथील नागरिकांची समस्या लक्षात घेवून माजरीच्या आरोग्य केंद्रात स्थायी वैद्यकीय अधिक्षक तथा रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) यांची नियुक्ती करावी, अशी  मागणी  पत्राद्वारे शिवसेनेचे (उबाठा ) शहर प्रमुख रविशंकर राय यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली होती, मात्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संदेश पाठवून वैद्यकीय अधिकारीची नेमणूक माझ्या अधिकार क्षेत्रात नसून, आपण याबाबत डीएचओ कडे मागणी करण्याचा सल्ला दिला.

 वरिष्ठांशी बोलून एका आठवड्यात वैद्यकीय अधिकारीची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार. आठवड्याभरात वैद्यकीय अधिकारी आले नाही तर इतर एका डॉक्टरची व्यवस्था करून देणार.                                                                                                                                                                                                                संजय आसूटकर,                                                   तालुका वैद्यकीय अधिकारी, भद्रावती 

माजरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरचे पद असतानादेखील येथे कंत्राटी तत्वावर बीएएमएस (आयुर्वेदिक) डॉक्टरांची नेमणूक केली जात आहे. परिसरातील जनतेला चांगली चिकित्सा मिळावी यासाठी काही महिन्यापूर्वी माजरीच्या दौऱ्यावर आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांची भेट घेवून शासनाच्या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी केली होती.                                                                                                                           रविशंकर राय,                                                     माजरी शहरप्रमुख, शिवसेना (उबाठा)

error: Content is protected !!