Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसावा हटविल्यास आंदोलन करणार

विसावा हटविल्यास आंदोलन करणार

1312

बजरंग दलाचे तहसिलदार व मुख्याधिकार्‍यांना निवेदन

नागभीड : येथे गेल्या अनेक वर्षापासून मृतदेहाला स्मशान भूमीत नेण्यापूर्वी विसावा देऊन विधिवत अंतिम संस्कार कार्य करण्या साठी स्मशान भूमिकडे जाणाऱ्या रस्त्यावर फ्रेण्ड्स कॉलनी जवळ असेलला विसावा हा बंद करण्यात येत असल्याचा फलक लावतांना नगर परिषदेचे कर्मचारी दिसताच काही संघटनानी आक्रमक भूमिका घेतली. व विसावा बंद केल्यास व हटविल्यास आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. व बजरंग दल शाखा नागभीड च्या वतीने तहसीलदार प्रताप वाघमारे, नगर परिषद मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.

.        सदर परिसरातील प्लॉट काही नागरिकांनी विसावा असल्याने अगदी कमी किमती मध्ये घेतले. त्यावेळी या परिसरात घरे फारशी झालेले नव्हती. मात्र आता एक व्यवसायिक त्याची दुकान या विसाव्याला लागून असल्याने त्याच्या दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांना त्रास होत असल्याने मोठ्या प्रमाणात या व्यक्तीने आर्थिक व्यवहार करून हा विसावा हटविण्यात यावा अशी मागणी केल्याचे जनतेत चर्चा आहे. मात्र या मागणीला भिक घालू नये अशी मागणी बजरंग  दलाच्या वतीने करण्यात आली आहे. गावापासून स्मशान भूमी लांब असल्याने हा विसावा योग्य ठिकाणी असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. व हा विसावा सरकारी जागेतच असल्याने कोणाचा याला आक्षेप सुद्धा नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता आहे त्याचं ठिकाणी विसावा ठेवावा ही मागणी करण्यात आली. जनतेचे मत न घेता विसावा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास बजरंग दलाच्या वतीने आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी निवेदनातून करण्यात आला. निवेदन देताना बजरंग दलाचे व विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!