Home चंद्रपुर जिल्हा विशेष पत्नीची हत्या करणाऱ्या धनपालला न्यायालयीन कोठडी

पत्नीची हत्या करणाऱ्या धनपालला न्यायालयीन कोठडी

1341

कोठारी : पतीने पत्नीवर संशय घेत दोघात कडाक्याचे भांडण झाले. पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीवर चाकू भोकसून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना काल दि. १२ सप्टेंला सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडपीपरी तालुक्यातील कुडेसावली येथे घडली. आरोपी धनपाल रामटेके यास पोलिसांनी अटक केली. शुक्रवार दि १३ सप्टेंबर ला पोलिसांनी बल्लारपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनवली आहे.

.      वृद्धपकाळात पत्नीवर संशय घेऊन चाकूने तिच्यावर घरीच वार करून जखमी केले होते. जखमी अवस्थेत पोलिसांनी उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतांना रस्त्यातच तिचा जीव गेला. या घटनेचा तपस पोलिसांनी करून हत्या करण्यात आलेला चाकू,रक्ताने माखलेले कपडे, अंगणातील रक्ताची माती आदी पुरावे जप्त केले आहेत. आरोपी धनपाल रामटेके यास न्यायालयात हजर केले असता त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे. कोठारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी या घटनेचा वेगाने तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले. मृतक वंदना रामटेके हिच्या मृत्यूने समस्त गावकरी हळहळले. धनपालच्या कृत्याचा संताप व्यक्त करीत होते. सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान कुडेसावली येथे सर्व गावकरी व कुटुंबाचा हजेरीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!