चंद्रपूर : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत ६३ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली गेली आहे.
. गणेश उत्सव मंडळांनीही अधिकृत वीज जोडणी घेणे बंधनकारक आहे. या मंडळांना जोडणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने विजेचे दर घरगुती दरानेच आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने यावर्षी चंद्रपूर मंडळाअंतर्गत ४७ व गडचिरोली मंडळ कार्यालयाअंतर्गत १६ असे एकूण ६३ अधिकृत वीज जोडणी चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाअंतर्गत देण्यात आलेले आहे.
. तसेच गणेशोत्सव मंडळांनी विदयूत उपकरणाच्या सुरक्षेवर भर द्यावा. जिथे गरज आहे तिथे अर्थिंग द्यावी. याबाबत सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात अनाधिकृतपणे विदयूत पुरवठा घेणे टाळावे असे आवाहन चंद्रपूर महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


