जिव घेणा खड्डा

1377

वरोरा : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोर्डा ग्रामपंचायतची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात ले-आऊट ने विखुरलेली बोर्डा ग्रामपंचायत अनेक समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. अनेक ले-आऊट मध्ये जाण्यासाठी रस्ते नाही. तर रत्नमाला चौकापासून ते श्रीनगर सिटी मध्ये जाणारा रस्ता पूर्ण पणे उखळला आहे. या रस्त्यावर भल्ला मोठा जिवघेणा खड्डा तयार झाला आहे.

.       दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा वाजले जातात. मागील वर्षी याच खड्ड्यात विद्यार्थी बसून असलेला स्कूल ऑटो फसला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. पुन्हा याही वर्षी तीच परिस्थिती आहे. एखाद्याचा जिव गेल्यावर बोर्डा ग्रामपंचायतला जाग येतील काय? असा सवाल श्रीनगर सिटी येथील नागरिक करू लागले आहे.

error: Content is protected !!