Home सामाजिक राजुरा येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिन संपन्न

राजुरा येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिन संपन्न

1358

राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिन साजरा करण्यात आला.

.      1 आगस्ट  हा दिवस जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो.  या दिवशी स्काऊट आणि गाईड यांना स्कार्फ चे महत्त्व व त्याचे उपयोग कश्या पद्धतीने केले जाते सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक स्काऊट लीडर रुपेश चिडे यांनी प्रात्यक्षिका द्वारे समजावून सांगितले त्या नंतर सर्वानी मिळून स्काऊट प्रार्थना गायन केले व वचन पठण केले. चंद्रकांत भगत, दिपा मडावी, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, छ.शिवाजी महाराज स्काऊट लीडर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.      यावेळी शिक्षिका  ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, मनीषा खामनकर,  पूजा विकास बावणे, अंजली कोंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिजामाता गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले. प्रास्ताविक रुपेश चिडे यांनी केले तर आभार सुनीता कोरडे  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!