Home शैक्षणिक कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचा  उत्कृष्ट निकाल

कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचा  उत्कृष्ट निकाल

1388

वैभव चौधरी तालुक्यात कला शाखेतुन प्रथम

नागभीड : नुकत्याच झालेल्या १२ वी च्या निकालात स्थानिक गोंडवन विकास संस्थेद्वारे संचालित सर्व सामान्यांची शैक्षणिक संस्था अशी ओळख असलेल्या कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाने या वर्षी सुध्दा आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

.       तालुक्यात दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव दामोदर चौधरी याने 83.50 टक्के गुण घेत कला शाखेतून तालुक्यात प्रथम  येण्याचा मान पटकावला आहे. कार्तिक गजानन मेंढुलकर 83.00 टक्के  तालुक्यातून द्वितीय तर स्वाती तुळशीदास झरकर ही विद्यार्थीनी 81.50 टक्के गुण घेत तालुक्यातुन तृतिय  तथा मुलींमधून प्रथम आली आहे.

.       विज्ञान शाखेतून अनुष्का अजय डोर्लीकर 75.50 टक्के प्रथम, नियती प्रकाश वाकडे 74.00 टक्के व्दितीय तर मंजीरी सुरेश शिवरकर, पंकज मनोहर गहाणे हे संयुक्तरीत्या 72.50 टक्के गुण घेत तृतीय ठरले आहेत. उत्तीर्णांमध्ये विज्ञान शाखेतून 1 तर  कला शाखेतून 12 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आलेले आहेत. महाविद्यालयाचा एकूण निकाल  96.29 टक्के असून कला शाखेचा 95.55 टक्के तर विज्ञान शाखेचा 98.14% आहे.

.       महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक इडपाचे यांनी सर्व प्राध्यापक वृंदांसह प्रत्यक्ष भेटी घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!